ETV Bharat / bharat

शरद पवारांच्या 'लेडी जेम्स बाँड'ची सुप्रिया सुळेंवर टीका; म्हणाल्या, 'सुळेंमुळं..." - Sonia Duhan On Supriya Sule - SONIA DUHAN ON SUPRIYA SULE

Sonia Duhan On Supriya Sule : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या लेडी जेम्स बाँड अशी ओळख असलेल्या नेत्या सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागत आहे, असा हल्लाबोल सोनिया दुहान यांनी केला.

Sonia Duhan On Supriya Sule
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 5:34 PM IST

Updated : May 28, 2024, 5:42 PM IST

मुंबई Sonia Duhan On Supriya Sule : लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यस्तरीय बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवा राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. तर 10 जून रोजी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्ष सोनिया दुहान अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवार यांच्या गटातील पक्ष प्रवेशावर सोनिया दुहाननं भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांच्यामुळेच आपल्याला पक्ष सोडावा लागणार असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

Sonia Duhan On Supriya Sule
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सोनिया दुहान (Reporter)

सुप्रिया सुळेंमुळे सोडावा लागणार आहे पक्ष : माध्यमांशी बोलताना सोनिया दुहान म्हणाल्या की, "आपण शरद पवार आणि पक्षाला सोडलेलं नाही. अशा प्रकारच्या अफवा कोण पसरवत आहे, हे आपल्याला माहीत नाही. आपण अजित पवार यांच्या पक्षात देखील गेलेलो नाही. पक्षात सर्व काही अलबेल नसून पक्ष सुप्रिया सुळे यांच्यामुळे आपल्याला सोडावा लागणार आहे, असा आरोप सोनिया दुहान यांनी केला.

Sonia Duhan On Supriya Sule
सोनिया दुहान (Reporter)

सुप्रिया सुळे यांनी विचार केला पाहिजे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष धीरज शर्मा यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी प्रवेश केला. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सोनिया दुहान म्हणाल्या की, "याविषयी सुप्रिया सुळे यांनी विचार केला पाहिजे. शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षापासून सोबत असलेले नेते अशा परिस्थितीत येऊन उभे राहिले आहेत. असा कोणता प्रश्न निर्माण झाला आहे, याचा विचार सुप्रिया सुळे यांना करणं गरजेचं आहे. त्यांच्या आजूबाजूला अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जात आहे की पक्षाचे लोक सोडून जात आहेत. याचा विचार त्यांना करणं गरजेचं आहे," असं सोनिया दुहान यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर सेल्फी टाकून पक्ष चालत नसतो : पक्षात सर्व ठीक ठाक आहे का या प्रश्नाला उत्तर देताना सोनिया दुहान म्हणाल्या की, "अजिबात नाही, कारण की आमच्यासारखे अनेक शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ असलेले लोक त्या प्रकारचा निर्णय घेत असल्यामुळे पक्षात सर्व काही अलबेल आहे असं म्हणता येणार नाही. पक्षातील कोणत्याही नेत्या विषयी आम्हाला अडचण नाही. आम्हाला अडचण सुप्रिया सुळे यांच्यापासून आहे. या विषयी मी बोलले तर अनेक विषय खोलात जाईल. या परिस्थितीबाबत शरद पवार यांना माहिती दिली आहे. त्यांनी समजून देखील घेतली आहे. याविषयी चर्चा झाली होती आणि या संदर्भात एकत्र बसून चर्चा करू, असं ते म्हणाले. दुसऱ्या दिवशी सुप्रिया सुळे यांचा मला फोन येतो, अशा काही गोष्टी बोलल्या जातात, त्यामुळे असं वाटू लागलं की पक्षाला राम राम केला पाहिजे. कोणत्याही पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. भविष्यातील राजकीय करिअर बाबत नंतर विचार करायचा. काम करायची मनस्थिती राहिली नाहीये. सोशल मीडियावर सेल्फी टाकून पक्ष चालत नसतो, पक्ष हा पक्षाप्रमाणे पुढं न्यायचा असतो, ही गोष्ट सुप्रिया सुळे यांना आणि पक्षातील लोकांनी समजून घेतली पाहिजे.

लवकरच पक्षाला ठोकणार रामराम : आपण लवकरच पक्षाला रामराम ठोकणार असल्याचं सोनिया दुहान यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांच्यामुळेच आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. धीरज शर्मा यांनी देखील पक्ष सोडला, त्याला कारण म्हणजे सुप्रिया सुळे याच आहेत. आम्ही दोघांनी पक्ष सोडण्याचं एकमेव कारण त्याच आहेत, असाही आरोप सोनिया दुहान यांनी केला आहे. याविषयी आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याविषयी आमच्याशी कोणीही संपर्क साधला नाही. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम सुरू असताना पक्षाची वाटचाल सुरळीत सुरू होती. परंतु अचानकपणे सगळं काही बदललं, याचा विचार करणं गरजेचं आहे. अती झाल्यामुळे आपण हा निर्णय घेत असून शरद पवार यांच्या पक्षा व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचा विचार आतापर्यंत आम्ही केला नव्हता. मात्र पक्ष सोडण्यासाठी मजबूर केल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे. सध्या कोणत्याही पक्षात जाण्यासंदर्भात विचार केला नाही. त्यामुळे पुढील राजकीय भूमिकेचा विचार केला नसल्याचं सोनिया दुहान यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. राजकीय दबावामुळे मुलाला जामीन मिळाला, अन् प्रश्न...; सुप्रिया सुळेंचा नितेश राणेंवर पलटवार - Supriya Sule Criticized Nitesh Rane
  2. बारामतीत काट्याची टक्कर? सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांच्या लढतीत अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला - Lok Sabah Election 2024
  3. बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी मोठं नाट्य, ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत सुप्रिया सुळेंकडून प्रश्न उपस्थित - Supriya Sule

Last Updated : May 28, 2024, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.