ETV Bharat / bharat

पहिल्या टप्प्यात देशात 60, तर महाराष्ट्रात 55 टक्के मतदान; बंगालमध्ये भरघोस मतदान; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती झालं मतदान? - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 8:43 PM IST

Updated : Apr 19, 2024, 10:21 PM IST

Lok Sabha Election 2024 Phase 1 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 102 जागांवर सुमारे 60 टक्के मतदान झालं. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.57 टक्के मतदान झालं. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये ६७.९१ टक्के मतदान झालं. कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झालं ते जाणून घ्या...

Lok Sabha Election 2024 Phase 1
Lok Sabha Election 2024 Phase 1
देशातील मतदानाची टक्केवारी

नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 Phase 1 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांमधील 102 जागांवर मतदान झालं. संध्याकाळी 6 नंतरही मतदान करण्यासाठी मतदार रांगेत उभे असल्याचं दिसून आलं. शुक्रवारी देशभरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे 60 टक्के मतदान झालं. या काळात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या काही तुरळक घटना घडल्या, तर छत्तीसगडमध्ये ग्रेनेड लाँचरच्या शेलच्या अपघाती स्फोटामुळं एका CRPF जवानाचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात 55 टक्के मतदान : आता वेध लागले आहेत ते लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे. देशात सात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहेत. पहिला टप्पा शुक्रवारी पार पडला. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रा ५५.२९ टक्के मतदान झालं.

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान : निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 77.57 टक्के मतदान झालं. तर बिहारमध्ये सर्वात कमी 46.32 टक्के मतदान झालं. त्रिपुरामध्ये ७६.१० टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये ६७.९१ टक्के मतदान झालं.

EVM मध्ये किरकोळ बिघाड : लोकसभा निवडणुकीसोबतच शुक्रवारी अरुणाचल प्रदेश तसंच सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकीसाठीही मतदान झालं. विविध मतदान केंद्रांवर लग्नाच्या पोशाखात अनेक नवविवाहित जोडपे, दिव्यांग मतदारांनी हक्क बजावला. तामिळनाडू, अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार बेटं तसंच आसाममधील काही बूथवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (EVM) किरकोळ बिघाड आढळून आला. सकाळी सात वाजता सुरू झालेलं मतदान सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होतं. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दुपारी ३ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 66.34 टक्के मतदान झालं. मेघालयमध्ये 62 टक्के मतदान झालं, तर पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये शांतता होती. आदिवासी संघटनांच्या संघानं स्वतंत्र मागणीसाठी अनिश्चित काळासाठी बंद पाळला होता. त्यामुळं काही काळ मतदानात व्यत्यय आला.

Lok Sabha Election 2024 Phase 1
देशातील मतदानाची टक्केवारी

बंगालमध्ये हिंसाचार : पश्चिम बंगालमधील कूचबिहार मतदारसंघात झालेल्या हिंसाचारामुळं मतदानावर परिणाम झाला. तृणमूल काँग्रेस तसंच भाजपाच्या सूत्रांनी सांगितलं की, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदानाच्या पहिल्या काही तासांत निवडणुकीतील हिंसाचार, मतदारांना धमकावणे, निवडणूक प्रतिनिधींवर हल्ले केल्याप्रकरणी अनुक्रमे 80 तसंच 39 तक्रारी दाखल केल्या आहेत. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये सुमारे 45.68 टक्के मतदान झालं.

मणिपूरमध्येही जवान जखमी : मणिपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत थोंगजू विधानसभा मतदारसंघात अज्ञातांमध्ये बाचाबाची झाली. छत्तीसगडमधील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त बस्तर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 58.14 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्याच्या विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान जखमी झाला.

हवामानामुळ मतदानावर परिणाम : तामिळनाडूमधील सर्व 39 लोकसभा जागांवर दुपारी 3 वाजेपर्यंत 40 टक्क्यांहून अधिक मतदान झालं. श्रीपेरंबदुर लोकसभा मतदारसंघांतर्गत तांबरमजवळील मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मतदानाला सुमारे एक तास उशीर झाला. अरुणाचल प्रदेशात एकूण 8 लाख 92 हजार 694 मतदारांपैकी 53 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हवामानामुळं सकाळी मतदानाची टक्केवारी सामान्य होती, परंतु हवामानात सुधारणा झाल्यानं मतदानाची टक्केवारी वाढली.

Lok Sabha Election 2024 Phase 1
देशातील मतदानाची टक्केवारी

शॉम्पेन जमातीनं प्रथम केलं मतदान : मुख्य निवडणूक अधिकारी पवन कुमार साई म्हणाले की, "राज्यातील काही मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मतदानाला विलंब झाला. मणिपूरमध्ये काही ठिकाणी ईव्हीएम बिघडल्याचंही वृत्त होतं. दुपारी 3 वाजेपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांच्या एकमेव लोकसभेच्या जागेसाठी 45.4 टक्के मतदान झालं." अधिका-यांनी सांगितलं की, "ईव्हीएममध्ये काही किरकोळ त्रुटी होत्या, त्या त्वरित दुरुस्त करण्यात आल्या. अंदमान आणि निकोबार बेटांमधील शॉम्पेन जमातीच्या सात सदस्यांनी प्रथमच केंद्रशासित प्रदेशातील एकमेव लोकसभा जागेसाठी मतदानाचा हक्क बजावला."

EVM बुडालं पाण्यात : आसामच्या लखीमपूरमधील बिहुपुरिया येथील तीन मतदान केंद्रांवर, होजई, कालियाबोर, बोकाखत येथील प्रत्येकी एक मतदान केंद्र, दिब्रुगढमधील नाहरकटिया येथील एका मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची नोंद करण्यात आली. नंतर या त्रुटी दूर करण्यात आल्या. दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यात 60.70 टक्के मतदान झालं. लखीमपूर परिसरात नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं वाहन घेऊन जाणारी बोट वाहून गेली. त्यामुळं त्या वाहनात ठेवलेले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्धवट पाण्यात बुडाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, वाहनाचा चालक, त्यात प्रवास करणारे निवडणूक अधिकारी पाणी शिरण्यापूर्वीच वाहनातून बाहेर पडले.

मुसळधार पाऊस असूनही 43.11 टक्के मतदान : बिहारमधील लोकसभेच्या चार जागांवर 75 लाख मतदारांपैकी सुमारे 40.92 टक्के मतदारांनी दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर लोकसभा मतदारसंघात मुसळधार पाऊस असूनही, मतदानाच्या पहिल्या सहा तासात 43.11 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदान केलं. राजस्थानमधील लोकसभेच्या 12 जागांवर मतदान झालं असून दुपारी 3 वाजेपर्यंत 41.51 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदान केलं. दुपारी 3 वाजेपर्यंत उत्तराखंडमधील लोकसभेच्या पाचही जागांवर 45.62 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 3 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागांवर 44.7 टक्के, तर, मध्य प्रदेशातील लोकसभेच्या सहा जागांवर 53.40 टक्के मतदान झालं. उत्तर प्रदेशात 47.44 टक्के, मिझोराममध्ये ४९ टक्के, नागालँडमध्ये 43.53 टक्के, पुद्दुचेरीमध्ये 58.86 टक्के आणि सिक्कीममध्ये 52.73 टक्के मतदान झालं. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगानं 1.87 लाख मतदान केंद्रांवर 18 लाखांहून अधिक मतदान कर्मचारी तैनात केले होते.

हे वाचलंत का :

  1. विधानसभेची तयारी लोकसभेतून; भाजपाच्या नव्या फंड्यामुळं आमदार, नेत्यांची धावपळ - Lok Sabha Election 2024
  2. "बारशाला गेला अन्...", मराठी म्हणीचा वापर करत पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका - Lok Sabha Election 2024
  3. नागपुरात ४७.९१ टक्के, तर रामटेकमध्ये ५२.३८ टक्के मतदान; प्रतिक्षा निकालाची - Nagpur Lok Sabha Constituency

Last Updated : Apr 19, 2024, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.