ETV Bharat / bharat

सीए फायनल परीक्षेत शिवम मिश्रा भारतात पहिला, जाणून घ्या यशाचं रहस्य - CA Final Result 2024 - CA FINAL RESULT 2024

CA Final Result 2024 : सीए फायनल परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्रानं भारतात पहिला क्रमांक पटकावला आहे. शिवमनं 500 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला असून त्याचं UPSC परीक्षा देण्याचं ध्येय आहे.

Shivam Mishra
शिवम मिश्रा (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 10:03 PM IST

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियानं मे महिन्यात झालेल्या सीए फायनल तसंच सीए इंटरमिजिएटचे निकाल जाहीर केले आहेत. दिल्लीतील सुखबीर नगर येथे राहणारा शिवम मिश्रानं ICAI च्या सीए फायनल परीक्षेत संपूर्ण भारतात पहिला क्रमांक पटकावला आहे. शिवमच्या या यशानंतर संपूर्ण कुटुंबात जल्लोषाचं वातावरण आहे.

भारतात पहिला आल्याचा आनंद : या यशानंतर शिवम मिश्रा म्हणाला की, "परीक्षेसाठी त्यानं केवळ मेहनतच घेतली नाही, तर त्याच्या कुटुंबाचीही यात महत्त्वाची भूमीका आहे. या संदर्भात त्यांनी सांगितलं की, ICAI अध्यक्षांनी स्वतः फोन करून सीए परीक्षेत भारतात पहिला आल्याची माहिती दिली. त्यामुळं मला खूप आनंद झाला होता. मात्र, यावर क्षणभर माझा बसला नाही".

परीक्षेचे व्यवस्थापन महत्वाचं : "मी चांगली रँक मिळवण्याचा विचार करत होता, पण मला स्वतःला कल्पना नव्हती की मी पहिला येईल. सीए होण्याच्या आपल्या पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी मनापासून अभ्यासच केला. तसंच परीक्षेचे व्यवस्थापन, वेळापत्रक बनवून प्रत्येक विषयावर विशेष भर दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच माला घरच्यांचाही तितकाच पाठिंबा मिळाला".

सीएमध्ये 50 वा रँक : "मला सीए फाऊंडेशनमध्ये 50 वा रँक मिळाला आहे, तर सीए इंटरमीडिएटमध्ये 20 वा रँक मिळाला आहे. त्यामुळं अंतिम फेरीत 500 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. साधारणपणे CA चा निकाल 8-10% ते 20-22% पर्यंत असतो. अशा स्थितीत पहिल्याच प्रयत्नात सीए उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही केवळ १% राहतात. एवढंच नाही तर, 500 गुणांसह मी नवा बेंचमार्कही तयार केला आहे".

यूपीएससीची तयारी करणार : "माझं पुढचं ध्येय एमबीए किंवा यूपीएससी कण्याचं आहे. इतर विद्यार्थ्यांना संदेश देताना शिवम म्हणाला की, कोणत्याही स्पर्धा परीक्षेत अभ्यासक्रमाला ओझं मानलं तर अभ्यासाचंही ओझं वाटेल. त्यामुळं नेहमी अभ्यासाचा आनंद घ्या. शिवमचे वडील व्यवसायानं ज्योतिषी आहेत, तर आई गृहिणी आहे. शिवमनं सांगितले की, तो ऑक्टोबरमध्ये त्याची आर्टिकलशिप पूर्ण करत आहे. त्यानंतर तो पुढील एक-दोन वर्षे काम करेल. नंतर एमबीए किंवा यूपीएसीसी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू करेल".

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.