ETV Bharat / bharat

Road Accident In Khagaria : लग्नावरुन परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; कार अन् ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात सात वऱ्हाड्यांचा मृत्यू - Road Accident In Khagaria

Road Accident In Khagaria : बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर पसराहा गावाजवळ वऱ्हाडाच्या कारला भीषण अपघात झाला. कार आणि ट्रॅक्टरच्या अपघातात सात वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला.

Road Accident In Khagaria
अपघातग्रस्त कार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 9:59 AM IST

पाटणा Road Accident In Khagaria : लग्नावरुन परतणाऱ्या वऱ्हाडावर काळानं घाला घातला आहे. वऱ्हाडाच्या कार आणि ट्रॅक्टरची भीषण धडक होऊन तब्बल 7 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक वऱ्हाडी जखमी झाले आहेत. ही भीषण अपघाताची घटना बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर पसराहा गावाजवळ घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करुन जखमींना रुग्णालयात दाखल केलं.

राष्ट्रीय महामार्ग 31 वर विद्यारतन पेट्रोल पंपाजवळ कार आणि ट्रॅक्टरमध्ये धडक झाली आहे. या अपघातात 7 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 नागरिक आणि 3 मुलांचा समावेश आहे. - रमेश कुमार, पोलीस अधीक्षक, गोगरी, खगरिया

लग्नावरुन परत येत होतं वऱ्हाड : थुट्टी मोहनपूर इथलं लग्न उरकून हे वऱ्हाड मडैया बिथाला गावाकडं परत येत होतं. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 31 वर विद्यारतन पेट्रोल पंपाजवळ वऱ्हाडांची कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात वऱ्हाडांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या वऱ्हाड्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस मृतांची ओळख पटवत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

विद्यारतन पेट्रोल पंपाजवळ झाला अपघात : गोगरीचे पोलीस अधीक्षक रमेश कुमार यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग 31 वर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन मुलांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. हे नागरिक लग्न समारंभातून मडैया बिथाला गावाकडं परत जात होते. पसराहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यारतन पेट्रोल पंपाजवळ कार आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. मृत झालेल्या नागरिकांमध्ये 4 नागरिक आणि 3 मुलांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक रमेश कुमार यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. मॉर्निंग वॉकला जाणं बेतलं जीवावर; भरधाव कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
  2. भरधाव टिप्परनं अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चिरडलं, हिंगणाच्या वानाडोंगरी येथील घटना
  3. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; चालक ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.