ETV Bharat / bharat

'या' पक्षानं एनडीएबरोबर केली हातमिळवणी, लोकसभेत दोन जागा मिळण्याची शक्यता - RLD chief Jayant Chaudhary join NDA

RLD chief Jayant Chaudhary join NDA : राष्ट्रीय लोकदलाचे ( RLD) राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी यांनी शनिवारी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते. या भेटीनंतर चौधरी यांनी आरएलडीनं एनडीएबरोबर युती करण्याचा निर्णय जाहीर केला.

Jayant Chaudhary join NDA
Jayant Chaudhary join NDA
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 7:37 AM IST

लखनौ RLD chief Jayant Chaudhary join NDA : राष्ट्रीय लोकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्ट करत एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलंय. भाजपानं जयंत चौधरी यांना महायुतीत काही जागा देऊ केल्या आहेत. त्या जागा लढण्यासाठी चौधरी तयार असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय : जयंत चौधरी यांनी पोस्टमध्ये म्हटले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकासाचा साक्षीदार होत आहे. गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. विकसित भारताचा संकल्प घेत यावेळी 400 पार करण्याची घोषणा पूर्ण करण्यासाठी एनडीए सज्ज आहे,"असं जयंत चौधरी यांनी म्हटलं आहे. भाजपा अध्यक्ष नड्डा यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जयंत चौधरी यांची भेट घेतल्याची पोस्ट केली आहे. "एनडीए परिवारात सामील होण्याच्या त्यांच्या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करतो. विकसित भारताच्या प्रवासात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशच्या विकासात तुमचं महत्त्वाचे योगदान असेल," असं नड्डा यांनी म्हटलं आहे.

मित्रपक्षांना एकूण सहा जागा देण्याचा निर्णय : भाजपानं उत्तर प्रदेशातील आपल्या मित्रपक्षांना एकूण सहा जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. या मित्रपक्षांमध्ये अपना दल (सोनेलाल पटेल), सुहेलदेव भारतीय समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल यांचा समावेश आहे. भाजपानं राष्ट्रीय लोकदलाला लोकसभेच्या दोन जागा देऊ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोकदल किती जागा लढवणार हे एक-दोन दिवसांत ठरवलं जाईल. सध्या चौधरी यांनी 2024 मध्ये मोदी सरकार परत सत्तेवर आणण्यासाठी एनडीएसोबत असल्याचे जात असल्याचं म्हटलं आहे.

पुन्हा एकदा मोदी सरकार येणार : पुढील लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष एनडीए आघाडीसोबत असल्याचं राष्ट्रीय लोकदलाचे राष्ट्रीय सचिव अनुपम मिश्रा यांचं म्हणणं आहे. "देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. शेतकरी, युवक, युवती, बेरोजगारांचे सर्व प्रश्न सोडवले जातील. जयंत चौधरी हे सरकारसोबत मिळून सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत," असं त्यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का :

  1. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला स्थान नाही
  2. राहुल गांधींनी आधी काँग्रेस पक्ष सावरावा, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा खोचक सल्ला
  3. भाजपानं विश्वासघात केला, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्यावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.