ETV Bharat / bharat

रिलायन्स जिओचं नेटवर्क डाऊन; वापरकर्त्यांना बसला फटका, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Reliance Jio Down - RELIANCE JIO DOWN

Reliance Jio Down : जिओचे नेटवर्क डाऊन झालं असल्याची तक्रार वापरकर्ते करत आहेत. नेटवर्क डाऊन असल्यानं याचा फटका जिओच्या वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे.

Etv Bharat
जिओ फाईल फोटो (Jio File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 5:30 PM IST

Updated : Jun 18, 2024, 5:55 PM IST

नवी दिल्ली Reliance Jio Down : देशभरात जिओचे अनेक वापरकर्ते आहेत. सुपरफास्ट स्पीडसाठी जिओ देशभरात ओळखलं जातं. मात्र, याच जिओचं नेटवर्क आता डाऊन झालं आहे. याबाबतची तक्रार अनेक वापरकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. WhatsApp, Instagram, X, Snapchat, YouTube आणि Google यासह सर्व प्लॅटफॉर्म वापरत असताना जिओच्या वापरकर्त्यांना अनेक अडचणी येत आहेत.

जिओचं नेटवर्क डाऊन : मिळालेल्या माहितीनुसार, 54 टक्क्यांहून अधिक तक्रारदारांना मोबाईल इंटरनेट वापरताना अडचणी येत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतानाही स्पीड स्लो असल्याच्या तक्रारी वापरकर्ते करत आहेत. त्यामुळं अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्याचं जग हे सुपरफास्ट इंटरनेटवर चालतं. त्यामुळं अवघ्या सेकंदात ऑनलाईन कामं होत असतात. त्यामुळं ग्राहकांना सुपफास्ट कामं करण्याची सवय लागली आहे. मात्र, अचानकच रिलायन्स जिओचं नेटवर्क डाऊन झाल्यानं याचा मोठा परिणाम वापरकर्त्यांना सहन करावा लागत आहे.

रिलायन्स जिओ ट्रोल : जिओ नेटवर्क डाऊन झाल्यामुळं वापरकर्त्यांना अडचणी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. जिओचं नेटवर्क डाऊन झाल्याचा असाच प्रकार एप्रिल महिन्यातही झाला होता. त्यावेळेही जिओ वापरकर्त्यांना अशाच समस्येचा सामना करावा लागला होता. दुसरीकडं, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मीम्स, कॉमेंट्स शेअर करून रिलायन्स जिओला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. Jio down, WhatsApp down, Instagram down, Telegram down, Snapchat down हे हॅशटॅग सर्वाधिक वापरले जात आहेत. जिओ मोबाईल इंटरनेट आणि जिओ एअरफायबरला मोठ्या तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा - गुजरातच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता जिओ वापरणे बंधनकारक, सरकारने काढली अधिसूचना

Last Updated : Jun 18, 2024, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.