नवी दिल्ली Ramdas Athawale vs Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण हटवण्याबाबत अमेरिकेत कथित वक्तव्य केलं. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेलं वक्तव्य संविधानाचा अपमान आहे. आरक्षण हटवण्याचा राहुल गांधींना काय अधिकार आहे? असा सवाल करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.
#WATCH दिल्ली: कांग्रेस सांसद और लोकसभा में नेता प्रतिपक्ष राहुल गांधी के बयान पर केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने कहा, " राहुल गांधी ने अमेरिका में जो बयान दिया है वो संविधान का अपमान करने वाला है... राहुल गांधी को क्या अधिकार है? यह भूमिका कांग्रेस पार्टी की है। कांग्रेस पार्टी… pic.twitter.com/2E7UEaWNmW
— ANI_HindiNews (@AHindinews) September 13, 2024
राहुल गांधींनी केला संविधानाचा अपमान : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत गेल्यानंतर आरक्षण हटवण्याबाबत कथित वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी जोरदार समाचार घेतला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. अमेरिकेत जाऊन बोलण्याची काहीच गरज नव्हती. राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेलं वक्तव्य संविधान विरोधी आहे. हा संविधानाचा अपमान आहे. आरक्षण हटवण्याचा राहुल गांधींना काय अधिकार आहे. काँग्रेस पक्ष हा आरक्षणविरोधी आणि आदिवासी विरोधी आहे. या वक्तव्याबाबत राहुल गांधी यांनी आणि काँग्रेस पक्षानं मापी मागितली पाहिजे, असा जोरदार हल्लाबोल मंत्री रामदास आठवले यांनी केला.
रिपाई करणार देशभरात आंदोलन : विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणावरील कथित वक्तव्याचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खरपूस समाचार घेतला. राहुल गांधींनी केलेल्या आरक्षणावरील वक्तव्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ( रामदास आठवले गट ) वतीनं देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा :
- राज्यात एकही आमदार नसलेल्या रामदास आठवलेंचा अजब दावा; म्हणाले, ...तर मीच मुख्यमंत्री होणार - Ramdas Athawale
- रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा हवाच; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मागणी - Ramdas Athawale
- पूजा खेडकर यांच्या कागदपत्रांची केंद्रीय समिती करणार चौकशी, राज्यातील नेते काय म्हणतात? - Pooja Khedkar Case