ETV Bharat / bharat

राम रहीमला पुन्हा भेटली सुटी; पोलिसांच्या बंदोबस्तात आज येणार कारागृहाबाहेर - Ram Rahim Furlough

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 12:33 PM IST

Ram Rahim Furlough : साध्वी बलात्कार आणि खून प्रकरणात गुरमीत राम रहीम कारागृहात आहे. मात्र पंजाब हरियाणाच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर गुरमीत राम रहीमला सुटी देण्यात आली आहे. आज सायंकाळी तो कारागृहातून बाहेर येणार आहे.

Gurmeet Ram Rahim
गुरमीत राम रहीम (ETV Bharat)

चंदीगड Ram Rahim Furlough : सिरसा डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याला साध्वी बलात्कार आणि खून प्रकरणात अटक करण्यात आलं आहे. राम रहीम याला पुन्हा एकदा कारागृहातू सुटी देण्यात आली आहे. गुरमीत राम रहीमला 21 दिवसाची फर्लो रजा मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे आज सायंकाळी 06.30 वाजता गुरमीत राम रहीम याला पोलीस बंदोबस्तात बाहेर काढण्यात येणार आहे. गुरमीत राम रहीम हा उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बर्नवा आश्रमात सुट्टी घालवणार आहे. गुरमीत राम रहीम हा 2017 पासून रोहतक न्यायालयात बंदिस्त आहे.

राम रहीमनं उच्च न्यायालयाकडं मागितली होती फर्लो रजा : गुरमीत राम रहीम याला साध्वी बलात्कार आणि खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र गुरमीत राम रहीम याला वारंवार कारागृहातील सुटी देण्यात येत असल्यानं मोठा वाद होत आहे. त्यामुळे गुरमीत राम रहीम पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गुरमीत राम रहीम यानं याचिका दाखल केल्यानंतर पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं याबाबत सरकारला प्रादिकरणाच्या नियमांच्या आधारे फर्लो किवा पॅरोल मंजूर करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे राज्य सरकारनं केवळ गुरमीत राम रहीमचं नाही, तर खून आणि बलात्कारासारख्या खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या 80 हून अधिक बंदीवानांना नियमानुसार पॅरोल किंवा फर्लो रजेचा लाभ देण्यात आला आहे, असं स्पष्ट केलं.

शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं दाखल केली याचिका : गुरमीत राम रहीम याच्या वतीनं अधिकाऱ्यांना फर्लोसाठी अर्ज देण्यात आला आहे. मात्र उच्च न्यायालयानं दिलेल्या 29 फेब्रुवारीच्या स्थगिती आदेशामुळे या याचिकेचा विचार झाला नाही. शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं (SGPC) दाखल केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं. या याचिकेत हरियाणा सरकारनं बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवूनही गुरमीत राम रहीमला वारंवार पॅरोलवर किंवा फर्लोवर सोडल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला.

तब्बल 10 वेळा सुटीवर बाहेर आला राम रहीम : गुरमीत राम रहीम हा 10 वेळा कारागृहातून बाहेर येत आहे. यापूर्वी त्याला 21 नोव्हेंबर 2023 रोजी 21 दिवसांची सुट्टी देण्यात आली. त्यावेळी तो बागपत आश्रमात गेला. हरियाणा पोलिसांनी त्याला कडेकोट बंदोबस्तात उत्तरप्रदेशातील बागपत इथल्या आश्रमात सोडलं. मात्र, प्रत्येक वेळी गुरमीत राम रहीमला पॅरोल मंजूर केल्यामुळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

राम रहीमला कधी मिळाली सुटी :

  • 24 ऑक्टोबर 2020 : रुग्णालयात दाखल असलेल्या आईला भेटण्यासाठी गुरमीत राम रहीमला 1 दिवसाचा पॅरोल मिळाला.
  • 21 मे 2021 : आईला भेटण्यासाठी दुसऱ्यांदा 12 तासांचा पॅरोल देण्यात आला.
  • 7 फेब्रुवारी 2022 : गुरमीत राम रहीमला कुटुंबीयांना भेटण्यासाठी 21 दिवसांची रजा मिळाली.
  • जून 2022 : गुरमीत राम रहीमला 30 दिवसांचा पॅरोल मिळाल्यानं तो उत्तर प्रदेशातील बागपत आश्रमात गेला.
  • 14 ऑक्टोबर 2022 : गुरमीत राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मिळाला. यावेळी त्यानं बागपत आश्रमात म्युझिक व्हिडिओही रिलीज केले.
  • 21 जानेवारी 2023 : गुरमीत राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मिळाला.
  • 20 जुलै 2023 : गुरमीत राम रहीमला 30 दिवसांच्या पॅरोल मिळाला.
  • 21 नोव्हेंबर 2023 : गुरमीत राम रहीम हा 21 दिवसांची सुट्टी घेऊन बागपत आश्रमात गेला.
  • 13 सप्टेंबर 2024 : गुरमीत राम रहीम 21 दिवसांची सुटी घेऊन बागपत आश्रमात गेला.

हेही वाचा :

  1. Gurmeet Ram Rahim Got Parole : बलात्कारी गुरमीत राम रहिमला 30 दिवसांचा पॅरोल, आज संध्याकाळी येणार बाहेर
  2. Baba Ram Rahim : ईशनिंदा प्रकरणी राम रहीम याची पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात याचिका
  3. Gurmeet Ram Rahim: राम रहीमने लावला टी20 क्रिकेटचा शोध?, व्हिडिओद्वारे केला अजब दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.