ETV Bharat / bharat

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ; मेगास्टार रजनीकांत यांच्यासह अनेक दिग्गजांची हजेरी - N Chandrababu Naidu - N CHANDRABABU NAIDU

N Chandrababu Naidu : तेलुगू देसम पक्षानं आंध्रप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं. तेलुगू देसम आणि पवन कल्याण यांच्या 'जनसेना' पक्षानं आंध्रप्रदेशच्या राजकारणात मोठी उलथापलथ केली. आज आंध्रप्रदेशात एनडीएचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू यांनी शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधीला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे.

N Chandrababu Naidu
चंद्राबाबू नायडू (ETV Bharat)
author img

By ANI

Published : Jun 12, 2024, 7:37 AM IST

Updated : Jun 12, 2024, 12:54 PM IST

अमरावती N Chandrababu Naidu : आंध्रप्रदेश विधानसभेत तेलुगू देसम पार्टीनं मोठं यश मिळवलं आहे. तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांचा आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण सोहळा पार पडला. त्यांच्या शपथविधीसाठी दक्षिणेकडच्या चित्रपटसृष्टीतील 'मेगास्टार' रजनीकांत हे विजयवाडा इथं दाखल झाले आहेत. रजनीकांत यांच्यासह त्यांच्या पत्नी लता रजनीकांत या देखील विजयवाडा इथं आल्या आहेत. तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे.

आज चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ : आंध्रप्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षानं मोठं यश मिळवल्यानंतर त्यांनी मंगळवारी राजभवनात जाऊन राज्यपाल एस अब्दुल नझीर यांची भेट घेतली. यावेळी चंद्राबाबू नायडू यांनी राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यपाल एस अब्दुल नझीर यांची भेट घेतली, यावेळी त्यांच्यासोबत जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण आणि भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष दग्गुबती पुरंदेश्वरी यांची उपस्थिती होती. चंद्राबाबू नायडू यांनी भारतीय जनता पार्टी आणि जनसेना युतीचं सरकार स्थापन केलं आहे. त्यांनी केंद्रातही एनडीए सरकारला पाठिंबा दिला आहे. आज चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीला देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे.

आंध्रप्रदेशात एनडीएनं मिळवलं मोठं यश : आंध्रप्रदेशातील निवडणुकीत एनडीएनं मोठं यश मिळवलं आहे. एनडीएतील घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसम, जनसेना आणि भाजपानं एकूण 175 जागांपैकी 164 जागांवर विजय मिळवला आहे. यात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षानं 135 जागा जिंकल्या आहेत. पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षानं 21 तर भाजपानं 8 जागांवर विजय मिळवला आहे. त्यानंतर एनडीएच्या बैठकीत चंद्राबाबू नायडू यांना मुख्यमंत्री करण्याचं ठरवण्यात आलं. या प्रस्तावाला जनसेना पक्षाचे नेते पवन कल्याण यांनीही पाठिंबा दिला. यावेळी पवन कल्याण यांनी, "जनसेना पक्षाकडून आम्ही चंद्राबाबू नायडू यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देत आहोत," असं स्पष्ट केलं. तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार चंद्राबाबू नायडू यांनी, "भाजपा, जनसेना आणि तेलुगू देसम पक्षाच्या आमदारांनी मला आंध्रप्रदेशचा मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला आहे," अशी माहिती दिली.

हा ऐतिहासिक विजय आहे, चंद्राबाबूंनी मानले आभार : या निवडणुकीत जनतेनं आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला. इतका मोठा विजय मला यापूर्वी कधीच मिळाला नाही. 1994 मध्ये एकतर्फी निवडणुका झाल्या, त्यानंतरही आम्हाला इतक्या जागा जिंकता आल्या नाही. तेलुगू देसम, भाजपा आणि जनसेना पक्षानं 164 जागा जिंकल्या. आम्ही फक्त 11 जागा गमावल्या, म्हणजेच 93 टक्के आम्ही जिंकलो. या निवडणुकीत सरासरी 57 टक्के मतदान झालं. प्रचंड यश मिळाल्यानं आमची जबाबदारी वाढली आहे," असं चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केलं. "युती मजबूत करण्यासाठी पवन कल्याण यांनी मोठे प्रयत्न केले. त्यामुळे मी पवन कल्याण यांना कधीही विसरू शकत नाही. त्यांनी तुरुंगात माझी भेट घेतली. मला तुरुंगात पाहिल्यानंतर पवन कल्याण यांनी तेलुगू देसम आणि जनसेना यांची युती होईल, असं सांगितलं. राज्याच्या विकासासाठी भाजपा, तेलुगू देसम आणि जनसेना यांनी युती केली. जनसेनेनं 21 पैकी 21 जागा जिंकल्या. भाजपानं 10 पैकी 8 जागा जिंकल्या. यावेळी जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला," असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. "ये पवन नहीं आँधी है" : नरेंद्र मोदींनी केलं जनसेना प्रमुख पवन कल्याणचं कौतुक - Pawan Kalyan
  2. चंद्राबाबू नायडूंनी निवडणूक जिंकल्याशिवाय विधानसभेत पाऊल न ठेवण्याची घेतली होती शपथ! - Chandrababu Naidu
  3. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड, 16 पक्षांचे 21 नेते बैठकीला हजर; राष्ट्रपतींनी लोकसभा केली विसर्जित - NDA Leaders Meeting

Last Updated : Jun 12, 2024, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.