ETV Bharat / bharat

वेटींग तिकिटावर स्लीपरमध्ये प्रवास करत असाल सावधान! रेल्वेनं लागू केले 'हे' नियम - Railway ticket news

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 2:03 PM IST

Updated : Jul 29, 2024, 2:23 PM IST

Railway ticket news विंडो वेटींग तिकिटावर स्लीपर डब्यात प्रवास केल्यास प्रवाश्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. काऊंटरवरून काढेलेलं वेटींग तिकीट रद्द होत नाही. त्यामुळे अनेक प्रवासी या तिकिटावर प्रवास करतात. परिणामी कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागतो. यामुळे रेल्वे प्रशासनाने नवीन नियम लागू केले आहेत.

Railway ticket news
वेटिंग तिकीट नवीन नियम (ETV Bharat Reporter)

हैदराबाद Railway ticket news: अलीकडेच संसदेमध्ये वेटीग तिकिटांचा मुद्दा चांगलाच गाजला. आता प्रवाशांना वेटींग तिकीट घेऊन स्लीपर कोचमध्ये प्रवास करणं महागात पडू शकतं. कारण अशा प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे. दंड ठोठावण्यासोबतच अशा प्रवाशांना जनरल रेल्वे कोचमध्ये हलवण्यात येणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? : अनेकदा प्रवाश्यांच्या तुलनेत रेल्वेत जागा उपलब्ध नसल्याचं वास्तव समोर येतं. तिकीट वेटींग असलेल्या प्रवाशांना जबदस्तीनं कोणत्याही डब्यात बसवण्यात येतं. त्यामुळे कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाश्यांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच बहुतेक वेळा प्रवाश्यांमध्ये जागेवरून वाद निर्माण होतो. संसदेत हा मुद्दा गाजल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

विंडो तिकिटातून स्लीपरमध्ये प्रवास करता येणार नाही: जर तुम्ही ऑनलाइन वेटींग तिकीट काढलं असेल आणि ते कन्फर्म झालं नसेल तर ते तिकीट आपोआप रद्द होतं. तसंच आपल्याला रिफंडदेखील मिळतो. परंतु आतापर्यंत असा गैरसमज होता की, विडो वेटिंग तिकीट घेतलं तर आपण स्लीपर कोचमध्येसुद्धा प्रवास करु शकतो. परंतु विंडो वेटिंग तिकीट असलेले प्रवाशीदेखील स्लीपर कोचमध्ये प्रवास करू शकणार नाहीत. मात्र, विंडो वेटींग तिकीट असलेल्या प्रवाश्यांना जनलर कोचमधून प्रवास करता येईल.

  • प्रवाश्यांना भरावा लागेल दंड: जर तुम्ही विंडो वेटींग तिकिटावर प्रवास करत आहात. दरम्यान तिकीट तपासनीस आले आणि त्यांनी तुम्हाला पकडलं तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

वेटींग तिकीट देण्यामागील कारण: एखादं कन्फर्म तिकीट रद्द केल्यास ती जागा रिकामी राहू नये. गरजुंना ती जागा उपलब्ध व्हावी म्हणून वेगवेगळ्या ट्रेनमध्ये वेटींग तिकीट काढण्याची व्यवस्था असते. रेल्वेचं काहीच नुकसान होणार नाही. जेव्हा कन्फर्म तिकीटधारकांची संख्या ट्रेनमधील जागांइतकीच असते, तेव्हा वेटींग तिकिटधारकांना जनरल कोचमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाते.

एक सीट कन्फर्म आणि बाकी वेटींग तर सवलत : तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, एका पीएनआर नंबरवरून दोन- तीन प्रवाश्यांनी तिकीट बुक केलं. त्यानंतर एकच सीट कन्फर्म झाल्यानंतर बाकी वेटींग प्रवाश्यांना सोबतीने प्रवास करता येवू शकतो. एखाद्या व्यक्तीने तिकीट रद्द केल्यास त्यांना त्वरीत तिकीट कन्फर्म करता येते.

उत्तर रेल्वेच्या वरिष्ठ डीसीएम रेखा शर्मा म्हणतात की, "विंडो वेटींग तिकीट फक्त जनरल कोचमध्ये प्रवास करण्यासाठी वैध आहे. जर एखाद्या प्रवाश्यांकडे विडो वेटींग तिकीट असेल तर तो स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवास करण्यास पात्र नाही. आरएसी किंवा कन्फर्म सीट असेल तेव्हाच तुम्ही प्रवास करू शकता. कारण एका पीएनआरवर पाच ते सहा प्रवाशांसाठी तिकिटे असतील आणि एक तिकिटही कन्फर्म असेल तर सर्व जनरल डब्यातून प्रवास करू शकतात. वेटींग तिकिटांसह स्लीपर कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांमुळे कन्फर्म सीट असलेल्या प्रवाशांना समस्या निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. आरपीएफचे जवानसुद्धा ट्रेनमध्ये गस्त घालतात. प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशाला तिकीट तपासनीस पुढील स्थानकावर सोडतात किंवा संबंधित प्रवाश्याला जनरल कोचमध्ये पाठवलं जातं. तसंच दंडही वसूल केला जातो." प्रवाश्यांनी वेटींग तिकीट घेऊनच जनरल डब्यातून प्रवास करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा

  1. रेल्वे प्रवाशांसाठी खुषखबर...! आयआरसीटीसीने वाढवली ऑनलाइन तिकिट काढण्याची मर्यादा, आता काढता येणार 'इतके' तिकिटे
  2. Ticket Broker Arrested : मध्य-पश्चिम रेल्वेवर १ हजार १५२ रेल्वे तिकीट दलालांना अटक

Last Updated : Jul 29, 2024, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.