ETV Bharat / bharat

FIR Against BS Yediyurappa: बी एस येडियुरप्पा अडचणीत : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचा आरोप, पोक्सोनुसार गुन्हा दाखल - FIR Against BS Yediyurappa

FIR Against BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईनं सदाशिवनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR Against BS Yediyurappa
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 9:34 AM IST

Updated : Mar 15, 2024, 9:57 AM IST

बंगळुरू FIR Against BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर एका 17 वर्षाच्या अल्पवयीन तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडितेच्या आईनं केला आहे. पीडितेच्या आईनं सदाशिवनगर पोलीस ठाण्यात माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या ( POCSO ) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सत्यता पडताळून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप : कर्नाटकमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर एका 17 वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या आईनं या प्रकरणी बंगळुरूमधील सदाशिवनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरुन माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमानुसार तसेच भांदवी कलम 354 ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तपासणार प्रकरणातील सत्यता : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर एका 17 वर्षीय मुलीच्या आईनं पीडितेच्या लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलीस या प्रकरमातील सत्यता पडताळून पाहणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या देशभर गाजत असताना भाजपा नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर खळबळजनक आरोप झाले. त्यामुळे कर्नाटकमधील राजकारण तापलं आहे. मात्र या प्रकरणी माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

हेही वाचा :

  1. BS Yediyurappa's granddaughter Suicide : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नातीची गळफास घेत आत्महत्या
  2. BS Yediyurappa: बी. एस. येडियुरप्पा यांच्यासाठी भाजपाने तोडला होता 'हा' नियम
  3. राईस मिलमध्ये लिपीक ते कर्नाटकचे चार वेळा मुख्यमंत्री.. सायकलवरून भाजपचा प्रचार केलेल्या येदियुरप्पांचा राजकीय प्रवास

Last Updated : Mar 15, 2024, 9:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.