नवी दिल्ली MODI on RUSSIA AUSTRIA TOUR : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार 8 जुलै रोजी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.
Over the next three days, will be in Russia and Austria. These visits will be a wonderful opportunity to deepen ties with these nations, with whom India has time tested friendship. I also look forward to interacting with the Indian community living in these countries.…
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना होत असताना म्हणाले की, "रशिया आणि ऑस्ट्रिया या दोन्ही देशांच्या भेटीमुळं भारताला या राष्ट्रांशी संबंध अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. पुढील तीन दिवसांत मी रशिया आणि ऑस्ट्रियामध्ये असेन. या दोन्ही देशांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी असेल. या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे."
" visit to russia and austria will deepen ties" says pm modi as he leaves on 2 nation visit
— ANI Digital (@ani_digital) July 8, 2024
read @ANI Story | https://t.co/rMLIsPkXuy#PMModi #Russia #Austria pic.twitter.com/ROTPU1kQ7A
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 जुलै रोजी मॉस्कोमध्ये असतील. त्यानंतर ते ऑस्ट्रियाला रवाना होतील. यादरम्यान पंतप्रधान मोदी रशियात होणाऱ्या 22 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांदरम्यान अनेक द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणार आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याविषयी माहिती दिली आहे. वार्षिक शिखर परिषदेमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना संरक्षण, व्यापार संबंध, गुंतवणूक संबंध, ऊर्जा सहकार्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील देवाण-घेवाण यासह द्विपक्षीय मुद्द्यांचा आढावा घेता येणार आहे.
अध्यक्ष पुतिन यांच्याकडून डिनरचं आयोजन : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींसाठी खासगी डिनरचं आयोजन केलं आहे. तर, मंगळवारी पंतप्रधान मोदी रशियातील भारतीयांशी संवाद साधणार आहेत. यानंतर रशियाच्या अध्यक्षांचे शासकीय निवासस्थान असलेल्या क्रेमलिनमध्ये एक कार्यक्रम होणार आहे. यानंतर दोन्ही नेत्यांमधील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
पहिलाच ऑस्ट्रिया दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जुलै रोजी या ऑस्ट्रियाला भेट देणार आहेत. पंतप्रधानांचा हा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा असणार आहे. ते ऑस्ट्रियाच्या चांसलरशी मर्यादित शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार आहेत. ऑस्ट्रिया हा एक महत्त्वाचा मध्य युरोपीय देश असून पायाभूत सुविधा, उच्च तंत्रज्ञान क्षेत्र, स्टार्ट-अप क्षेत्रं, मीडिया आणि मनोरंजन या क्षेत्रांमधील मुद्द्यांवरून चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा