ETV Bharat / bharat

PM Narendra Modi : 'भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश'; सेमी कंडक्टर प्रकल्पांची पंतप्रधान मोदींनी केली पायाभरणी - Three Semiconductor plants

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील दोन सेमी कंडक्टर प्रकल्पाची तर एका आसाममधील प्रकल्पाची पायाभरणी केली. "सेमी कंडक्टर प्रकल्पामुळे हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल," असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

PM Narendra Modi
संग्रहित छायाचित्र
author img

By ANI

Published : Mar 13, 2024, 12:59 PM IST

अहमदाबाद PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील 'इंडियाज टेक: चिप्स फॉर डेव्हलप्ड इंडिया'मध्ये सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमी कंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "या प्रकल्पांमुळे सेमी कंडक्टर उद्योगात हजारो तरुणांना रोजगार मिळेल. त्यासह इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना मिळेल," असं स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला.

जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाचे नेतृत्व करण्यास सक्षम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक सेमी कंडक्टर उद्योगाचं नेतृत्व करण्यासाठी एंड टू एंड सेमी कंडक्टर इकोसिस्टम तयार करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं सेमी कंडक्टर मिशनची स्थापना केली आहे. त्यामुळे या प्रकल्पांमुळे तरुणांना रोजगारांची संधी निर्माण होतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळ स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील धोलेरा इथं भारतातील पहिली फॅब सुविधा तर गुजरातमधील साणंद आणि आसाममधील मोरीगाव इथं आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली आणि चाचणी (OSAT) अशा दोन प्रकल्पांची पायाभरणी त्यांनी यावेळी केली.

भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश : गुजरात इथल्या कार्यक्रमांत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो तरुणांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, की भारत हा जगातील सगळ्यात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे. आम्ही नॅशनल क्वांटम मिशन (NQM) हा प्रकल्प सुद्धा सुरू केला आहे. भारतात मोठ्या प्रमाणात एआयचा वापर होत असून त्याचा विस्तारही होत आहे. आम्ही फक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करत नसून तंत्रज्ञानाच्या प्रगतीत पुढं जात आहोत," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. PM Narendra Modi : मोदींच्या हस्ते 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा, तर 6000 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी, मुंबईतील किती स्थानकांचा समावेश?
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशला देणार 'मोठी भेट' : चार वंदे भारत, पाच जनऔषधी केंद्रासह 'या' प्रकल्पांचा आहे समावेश
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्याला इंग्लंडमधून आला कॉल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.