ETV Bharat / bharat

Agra Crime News : प्रेयसीला जंगलात बोलावून सामूहिक बलात्कार, प्रियकरासह दोन मित्रांना अटक - Agra crime physical abuse news

Gang Rape in Agra : उत्तर प्रदेशातील आग्रा इथं तीन तरुणांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केलाय. विशेष म्हणजे आरोपींपैकी एक पीडितेचा प्रियकर आहे. प्रियकरानंच बाहेर फिरायला नेण्याच्या बहाण्यानं तरुणीला जंगलात बोलावलं होतं.

Gang Rape in Agra: प्रियकरानं प्रेयसीला जंगलात बोलावलं आणि दोन मित्रांसह केला बलात्कार, आरोपींना 24 तासांत अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 10:46 AM IST

आग्रा Gang Rape in Agra : उत्तर प्रदेशातील सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैलास मंदिराजवळील जंगलात शनिवारी सायंकाळी तीन तरुणांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आलीय. प्रियकरानेच पीडितेला जंगलात भेटण्यासाठी बोलावलं होतं. यानंतर त्यानंच पीडितेला मित्रांच्या ताब्यात दिले. तिघांनी तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर घाबरलेल्या पीडितेनं घरी पोहोचून तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 24 तासात तिन्ही आरोपींना अटक केली.

प्रियकरासह तिघांचा तरुणीवर बलात्कार : सिकंदरा पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक नीरज शर्मा यांनी सांगितलं की, "या तरुणीची आरोपीसोबत मैत्री होती. शनिवारी आरोपीनं मुलीला बाहेर फिरवण्याच्या बहाण्यानं बोलावलं. आरोपीनं तिला दुचाकीवर बसवून जंगलात नेलं. तिथं तिच्यावर बलात्कार झाला. त्यानंतर आरोपीनं त्याचे मित्र अरविंद आणि योगेश यांना बोलावून घेतलं. पीडितेच्या प्रियकरानं तरुणीला मित्रांच्या ताब्यात दिलं. यावर तिनं विरोध केला असता आरोपींनी तिला धमकावल्याचा आरोप पीडितेनं केला. त्यानंतर अरविंद आणि योगेश यांनी तिच्यावर बलात्कार केला. धमकी देऊन आरोपी पळून गेले.

पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल : यानंतर पीडितेनं घरी येऊन प्रियकर आणि त्याच्या मित्रांच्या कृत्याबद्दल आईला सांगितलं. त्यामुळं कुटुंबीयांनी पीडितेला तात्काळ सिकंदरा पोलिस ठाण्यात नेलं. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. पीडितेवरही वैद्यकीय उपचार केले आहेत.

24 तांसात तिन्ही आरोपींना अटक : प्रभारी निरीक्षक नीरज शर्मा यांनी सांगितलं की, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पीडितेनं आरोपीचा मोबाईल क्रमांक सांगितला होता. त्यामुळं पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस केलं. यासोबतच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेजही तपासलं. त्यानंतर पोलिसांनी पीडितेचा प्रियकराला पकडलं आणि त्यानंतर दोन्ही आरोपींनाही पकडलं. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत सामूहिक बलात्काराच्या तिन्ही आरोपींना अटक करुन तुरुंगात रवानगी केलीय.

हेही वाचा :

  1. अंधाराचा फायदा घेत आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  2. Rape Case On Sajjan Jindal: 'उद्योगपती सज्जन जिंदाल बलात्कार प्रकरण खोटं'; मुंबई पोलिसांकडून न्यायालयात 'क्लोजर रिपोर्ट' सादर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.