नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी राज्यसभेत सभापती विरोधी पक्षनेत्यांनाही बोलू देत नाहीत, असा गंभीर आरोप केला. राज्यसभेचे सभापती पक्षपाती धोरण अवलंबत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर खासदार मनीष तिवारी यांनीही सरकारवर मोठा हल्लाबोल केला. आम्ही सदन चालवण्याचा प्रयत्न करतो, मात्र सत्ताधारी चिथावणी देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 चांगलंच गदारोळात पार पडत असल्याचं स्पष्ट होत आहे.
#WATCH | Delhi: Congress MP Karti Chidambaram says, " ...bjp nishikant dubey gets a chance to speak in-house every day. every time he speaks in-house, he makes very controversial statements...when our member mentions the name of the company, the chair wants to expunge the name of… pic.twitter.com/nHFMutNoO9
— ANI (@ANI) December 12, 2024
काही खासदारांनाच मिळते बोलण्याची संधी : संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 सुरू झाल्यापासून मोठा वाद उभा राहिला आहे. लोकसभा आणि राज्यसभाही खासदारांच्या गदारोळांमुळे वारंवार तहकूब करावी लागत आहे. याबाबत काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी सत्ताधारी खासदारांवर आरोप केला. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना दररोज सभागृहात बोलण्याची संधी मिळते. प्रत्येक वेळी ते सभागृहात बोलतात, तेव्हा ते अतिशय वादग्रस्त विधानं करतात. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर गंभीर आरोप करण्यास मोकळीक दिली जाते. अनियंत्रित सरकारचा हेतू सभागृह चालवण्याचा नसून विरोधकांना चिथावणी देण्याचा आहे, असा गंभीर त्यांनी केला.
" lop in rajya sabha not allowed to speak," congress' jairam ramesh alleges partial behaviour by rajya sabha chairman
— ANI Digital (@ani_digital) December 12, 2024
read @ANI Story | https://t.co/4plgQ76I4g#RajyaSabha #JairamRamesh #Congress #Opposition pic.twitter.com/Kev01AeIJ4
जयराम रमेश यांचा राज्यसभेच्या सभापतींवर गंभीर आरोप : काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "राज्यसभेत तर विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं जात नाही. सभापती पक्षपाती धोरण अवलंबत आहेत," असा आरोप त्यांनी यावेळी केला. काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनीही सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. "आम्ही सदन चालवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण सरकारला सभागृह चालवायचं नाही. सत्ताधारी खासदार सारखं चिथावणी देणारं वक्तव्य करत आहेत. काही खासदार भाग्यवान असून त्यांना दररोज शून्य तासात बोलण्याची संधी मिळते, तर काही खासदारांना संपूर्ण कालावधीत एकदाच बोलण्याची संधी मिळते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
#WATCH | Delhi: Congress MP Manish Tewari says, " we are trying to run the house but the government does not want to run the house. the unnecessary provocations which consistently emanate from the treasury benches are very indicative of the desire to subvert the proceedings of the… pic.twitter.com/GXbmlgdJvo
— ANI (@ANI) December 12, 2024
हेही वाचा :
- उपराष्ट्रपतींचा हल्लाबोल; म्हणाले 'देशाची प्रगती काही काही शक्तींना पचत नाही, राष्ट्रविरोधी कारस्थान हाणून पाडण्यासाठी एकत्र रहा'
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधकांचा प्रचंड गदारोळ, राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब, लोकसभेत विरोधक आक्रमक
- संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधकांच्या प्रचंड गदारोळानंतर लोकसभा, राज्यसभा उद्यापर्यंत तहकूब