नवी दिल्ली-ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांचे पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले. "त्यांनी 17 व्या लोकसभेत मोठे योगदान दिले आहे. त्यांचे सर्वांना मार्गदर्शन मिळेल. नम्र, कुशल व्यक्तीच यशस्वी होतो. ओम बिर्ला यांनी नवीन इतिहास रचला आहे. तरुण खासदारांना बिर्ला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल," असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
"संसदेत पुन्हा खासदारांचे निलंबन होऊ नये," अशी अपेक्षा खासदार अखिलेश यादव यांनी केली. "तुमचा आवाज सत्ताधारी पक्षावरदेखील चालला पाहिजे. सत्ता पक्षासह विरोधी पक्षाचाही तुम्ही सन्मान करावा. कोणत्याही लोकप्रतिनिधीचा आवाज दबला जाऊ नये," अशी अपेक्षाही खासदार अखिलेश यादव यांनी केली.
बिर्ला यांनी बलराम जाखड यांचा मोडला विक्रम! : राजस्थानमधील बलराम जाखड हे सलग दोन वेळा साडेनऊ वर्षांहून अधिक काळ लोकसभेचे अध्यक्ष राहिले. त्यांचा कार्यकाळ 22 जानेवारी 1980 ते 15 जानेवारी 1985 असा होता. यानंतर, 16 जानेवारी 1985 ते 18 डिसेंबर 1989 पर्यंत ते लोकसभेचे अध्यक्ष पद भूषविले होते. याआधी नीलम संजीव रेड्डी याही दोन वेळा लोकसभेच्या अध्यक्ष होत्या. मात्र त्यांच्या दोन्ही कार्यकाळात काही वर्षांचे अंतर होते. त्यांचा कार्यकाळही सुमारे अडीच वर्षांचा आहे. एक कार्यकाळ पूर्ण करून दुसऱ्यांदा सलग लोकसभा पद भूषविणारे बिर्ला हे दुसरे लोकसभा अध्यक्ष ठरले आहेत.
#WATCH | Prime Minister Narendra Modi says " respected speaker, it is the good fortune of the house that you are occupying this chair for the second time. i congratulate you and the entire house" pic.twitter.com/vKm5b8zv4I
— ANI (@ANI) June 26, 2024
ओम बिर्लांचा असा राहिला राजकीय प्रवास: ओम बिर्ला हे १९७८-७९ मध्ये बहुउद्देशीय शाळेचे विद्यार्थी संघाचे अध्यक्ष होते. यानंतर त्यांनी कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर 1987 ते 1991 पर्यंत ते भारतीय जनता युवा मोर्चा कोटाचे अध्यक्ष होते. याशिवाय 1987 ते 1995 पर्यंत ते कोटा को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर होलसेल भंडार लिमिटेडचे अध्यक्ष होते. ते 1993 ते 1997 पर्यंत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. तर 1997 ते 2003 पर्यंत राष्ट्रीय उपाध्यक्ष होते.
ओम बिर्लांच्या कुटुंबात कोण आहेत: बिर्ला यांचे वडील श्री कृष्णा हे राज्य कर विभागात सरकारी कर्मचारी होते. तर आई शकुंतला देवी गृहिणी होत्या. बिर्ला यांना सहा भाऊ आणि तीन बहिणी आहेत. त्यांचे दोन मोठे भाऊ राजेश कृष्ण बिर्ला आणि हरिकृष्ण बिर्ला हे देखील सहकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. बिर्ला यांच्या पत्नी अमिता बिर्ला या सरकारी डॉक्टर आहेत. त्यांना दोन मुली आहेत. त्यापैकी मोठी मुलगी आकांशा विवाहित असून त्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत. धाकटी मुलगी अंजली सनदी अधिकारी आहेत.
हेही वाचा-