ETV Bharat / bharat

भाजपाची बिहारच्या लोकसभा उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर; एकाही महिला उमेदवाराला दिलं नाही तिकीट - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं आपली यादी जाहीर केली आहे. या यादीत बिहारमधील 17 उमेदवारांमध्ये एकाही महिलेचं नाव नाही.

Lok Sabha Election 2024
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 2:10 PM IST

पाटणा Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपानं उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बिहारमधील 17 उमेदवारांच्या या यादीत एकाही महिलेचं नाव नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलतात. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं महिला आरक्षण कायदाही पारित केला. मात्र बिहारमध्ये एकाही महिलेला उमेदवारी दिली नसल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडं 2019 च्या तुलनेत 2024 ची लोकसभा निवडणूक एनडीएसाठी सोपी नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच उमेदवार निवडताना भाजपा नेते मोठी काळजी घेताना दिसत आहेत.

भाजपाच्या 17 उमेदवारांमध्ये एकही महिला नाही : भाजपानं शनिवारी लोसकभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपानं बिहारमध्ये 17 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र या 17 उमेदवारांच्या यादीत एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. भाजपानं पश्चिम चंपारणमधून संजय जैस्वाल, पूर्व चंपारणमधून राधामोहन सिंग, मधुबनीतून अशोक कुमार यादव, अररियातून प्रदीप कुमार सिंह, दरभंगामधून गोपाल ठाकूर, मुझफ्फरपूरमधून राजभूषण निषाद, महाराजगंजमधून जनार्धन सिंग सिग्रीवाल, सारणमधून राजीव प्रताप रुडी, उझियारपूरमधून नित्यानंद राय, बेगुसरायमधून गिरिराज सिंग, पाटणा साहिबमधून रविशंकर प्रसाद, पाटलीपुत्रमधून राम कृपाल यादव, आरामधून आर के सिंग, बक्सरमधून मिथिलेश तिवारी, सासाराममधून शिवेश राम, औरंगाबादमधून सुशील कुमार सिंग आणि नवादामधून विवेक ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र एकही महिला उमेदवाराला तिकीट देण्यात आलं नाही.

एकमेव खासदार महिलेचं कापलं तिकीट : भाजपाकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रमा देवी या एकमेव खासदार निवडून आल्या होत्या. रमा देवी यांनी शिवहर इथून विजय संपादन केला होता. मात्र यावेळी शिवहर मतदार संघ जेडीयूला सुटला आहे. जेडीयू नेते आनंद मोहन यांच्या पत्नी लवली आनंद यांना उमेदवारी दिली आहे. जातीय समीकरण पुढं ठेवत लवली आनंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रमा देवी यांचे पती ब्रिज बिहारी प्रसाद हे बिहार सरकारमध्ये मंत्री होते. ब्रिज बिहारी प्रसाद यांना लालू प्रसाद यादव यांचे कट्टर समर्थक मानण्यात येते.

हेही वाचा :

  1. Lok Sabha Elections : प्रत्येक गावातून दोन उमेदवार....; मराठा युवक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, अशी असेल रणनीती
  2. "आपके साथ रहेंगे अब इधर-उधर नहीं जाएंगे"; नितीश कुमारांच्या विधानावर पंतप्रधानांना हसू आवरेना
  3. आम्ही भाजपाला हटवणार! राहुल गांधींचा निर्धार; भाजपा देशात द्वेश पसरवत असल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.