ओडिशा : Puri Jagannath Temple : पुरी येथील जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली ओडिशा पोलिसांनी नऊ बांगलादेशींना ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. आज सोमवार (4 मार्च)रोजी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. दरम्यान, मंदिर प्रशासनाचे काही नियम आहेत. त्या नियमांचं या लोकांनी उल्लंघन केलं ही गोष्ट लक्षात येताच आम्ही त्यांना ताब्यात घेतलं अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सिंहद्वार पोलीस ठाण्यात तक्रार : विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. या कार्यकर्त्यांनी तक्रारीत काही गैर हिंदू बांगलादेशी इसम पुरातन मंदिरात प्रवेश करत आहेत. तसंच, मंदिर समितीच्या नियमांचं उल्लंघन करत आहेत अशी तक्रार दिली होती. त्यानंतर याप्रकरणी सिंहद्वार पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी नऊ बांगलादेशी लोकांना ताब्यात घेतलं आहे.
संशयास्पद लोकांना पोलिसांनी अडवलं : पुरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुशील मिश्रा याबाबत बोलताना म्हणाले, आम्हाला काही बांगलादेशी गैर-हिंदूंनी मंदिरात प्रवेश केल्याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांचं एक पथक मंदिराकडे रवाना झालं आहे. या संशयास्पद लोकांना पोलिसांनी अडवलं. तसंच, त्यांना ताब्यातही घेतलं आहे. त्यानंतर आता आमचे काही वरिष्ठ अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत.
कागदपत्रांचीही तपासणी करण्यात आली : मदिराच्या नियमांनुसार या मंदिरात केवळ हिंदू भाविक प्रवेश करू शकतात. सुशील मिश्रा यांनी सांगितलं की, ज्या बांगलादेशींना ताब्यात घेतलं आहे ते गैर हिंदू असतील तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आम्ही त्यांचे पासपोर्ट तपासले आहेत. तपासाअंती लक्षात आलं आहे की, या नऊ जणांपैकी एक इसम हिंदू आहे. तसंच, इतरांच्या पासपोर्ट आणि कागदपत्रांचीही तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, ज्या नऊ जणांना आम्ही ताब्यात घेतलं, त्यापैकी चार जणांनी मंदिरात प्रवेश केला होता. तर इतर पाचजण मंदिरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते असा खुलासाही त्यांनी केला आहे.
गोमांस खाणाऱ्यांना मंदिरात जाण्याची परवानगी नाही : गन्नाथ मंदिराच्या नियमावलीनुसार गैर-हिंदू आणि मांसाहारी व्यक्तींना मंदिरात जाण्याची परवानगी नाही. अलीकडेच यूट्युबर काम्या जानीच्या जगन्नाथ मंदिर दर्शनावरून मोठा वाद उफाळला होता. काम्या जानी गोमांस खात असल्याचा दावा काही लोकांनी केला होता. गोमांस खाणारी काम्या जानी जगन्नाथ मंदिरात गेलीच कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. गोमांस खाणाऱ्यांना मंदिरात जाण्याची परवानगी नसून काम्या जानीने मंदिरात प्रवेश केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. परंतु, काम्या जानीने नंतर स्पष्टीकरण दिलं की, ती गोमांस खात नाही.
हेही वाचा :
1 "अब की बार भाजपा तडीपार"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, 'या' खासदाराला आडवं करण्याचा इरादा