ETV Bharat / bharat

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक! अजामीनपात्र वॉरंट जारी, वाचा काय आहे प्रकरण - Former CM Yediyurappa

Former CM Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलय. त्यांच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा
माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (Etv Bharat National Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 7:54 PM IST

बेंगळुरु Former CM Yediyurappa : बेंगळुरू न्यायालयानं गुरुवारी पोक्सो प्रकरणात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं. सीआयडीनं बी एस येडियुरप्पा यांना चौकशीसाठी हजर न राहिल्याबद्दल वॉरंट जारी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

काय आहे प्रकरण : 17 वर्षीय मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354A (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर्षी फेब्रुवारीमध्ये कर्नाटकातील आपल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला होता. याप्रकरणी महिलेनं मार्चमध्ये तक्रार दाखल केली होती. 81 वर्षीय येडियुरप्पा यांनी आरोप फेटाळून लावत हे प्रकरण कायदेशीररित्या लढणार असल्याचं सांगितलं.

अटक होण्याची शक्यता : गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) या प्रकरणाचा तपास करत असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगणारी नोटीस बजावली असून गरज पडल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते, असं कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी म्हटलं होतं. तसंच प्रक्रियेनुसार त्यांना नोटीस देण्यात आली आहे. 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करावं लागेल. त्यापूर्वी सीआयडी आरोपपत्र दाखल करतील. त्यासाठी त्यांना प्रक्रिया अवलंबावी लागणार आहे. त्याचप्रमाणे सीआयडीला आवश्यक वाटत असेल तर ते त्यांना अटक करतील, असंही गृहमंत्र्यांनी म्हटलंय.

सीआयडी करत आहे तपास : सदाशिवनगर पोलीस ठाण्यात येडियुरप्पा यांच्यावर 3 मार्च 2024 रोजी अल्पवयीन लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरुन पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीच्या आधारे सदाशिवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली. सरकारनं या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला. अलीकडेच सीआयडी अधिकाऱ्यांनी येडियुरप्पा यांना नोटीस बजावून दुसऱ्यांदा सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, येडियुरप्पा यांनी सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी वेळ मागितला होता. त्यामुळं तपास अधिकाऱ्यांनी ट्रायल कोर्टात धाव घेतली. आता येडियुरप्पा यांच्या विरोधात कोर्टानं अजामिनपात्र वॉरंट काढल्यानं त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. जर त्यांना या प्रकरणात अटक झाली तर, पक्सोच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले ते पहिले माजी मुख्यमंत्री ठरतील.

हेही वाचा :

  1. FIR Against BS Yediyurappa: बी एस येडियुरप्पा अडचणीत : अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचा आरोप, पोक्सोनुसार गुन्हा दाखल
  2. कर्नाटकात आता बसव'राज'; मुख्यमंत्रीपदाचा शपथ ग्रहण सोहळा संपन्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.