नवी दिल्ली NEET UG Result 2024 : राष्ट्रीय टेस्टींग एजन्सीनं NEET UG Examination 2024 चं आयोजन केलं होतं. मात्र यातील 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्यानं मोठा वाद झाला. त्यामुळे काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत याबाबत मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रीय टेस्टींग एजन्सीनं 1563 ग्रेस मार्क दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची 23 जूनला पुन्हा परीक्षा होणार आहे. दुसरीकडं समुपदेशनाची प्रक्रिया वेळापत्रकाप्रमाणं सुरू राहणार असल्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले आहेत.
ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची होणार पुन्हा परीक्षा : एनटीएनं NEET UG Examination 2024 परीक्षेत 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले होते. मात्र या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्कावरुन मोठं रान पेटलं. काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानं आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी घेतली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं ग्रेस मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार 23 जूनला ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार होणार प्रक्रिया : सर्वोच्च न्यायालयानं NEET UG Examination 2024 मध्ये 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्यानं त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. मात्र इतर विद्यार्थ्यांच्या प्रक्रियेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. या विद्यार्थ्यांचा समुपदेशन कार्यक्रम जुलै महिन्यात वेळापत्रकानुसार पार पडणार असल्याचं एनटीएच्या वतीनं यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
हेही वाचा :
- नीट परीक्षेची सीबीआय चौकशी करा; शिक्षक, पालकांची मागणी - Neet Exam
- आता नीट परीक्षेत घोटाळा? गुणांमध्ये प्रचंड वाढ; पालकांकडून परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’वर शंका, पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी - NEET exam scam
- नीट 2024 पेपर लीक प्रकरणी एनटीएनं पुन्हा दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, "यंदा सरासरी गुणांमध्ये 45 टक्क्यांनी वाढ" - Nta On Neet Ug