ETV Bharat / bharat

का साजरा केला जातो राष्ट्रीय सागरी दिन; जाणून घ्या काय आहे इतिहास - National Maritime Day 2024 - NATIONAL MARITIME DAY 2024

National Maritime Day 2024 : राष्ट्रीय सागरी दिन 5 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. या दिवशी सागरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कारणाऱ्या खलाशांना सन्मानित करण्यात येते.

National Maritime Day 2024
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 12:09 PM IST

हैदराबाद National Maritime Day 2024 : देशाच्या विकासात सागरी क्षेत्राचा महत्वाचा वाटा राहिला आहे. सागरी क्षेत्राचं आंतरराष्ट्रीय व्यापार, वाहतूक, संस्कृती देवाणघेवाण आणि राष्ट्रीय जीडीपीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 5 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज देश 61 वा राष्ट्रीय सागरी दिन साजरा करत आहे.

का साजरा करण्यात येतो राष्ट्रीय सागरी दिन साजरा : भारताच्या विकासात सागरी क्षेत्राचा मोठा सहभाग आहे. 1919 मध्ये सिंधीया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडचं पहिलं जहाज एसएस लॉयल्टी पाण्यात उतरलं होतं. एसएस लॉयल्टी हे जहाज मुंबई ते लंडन दरम्यान चालवण्यात गेलं होतं. सिंधीया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेड या कंपनीची स्थापना महाराजा माधवराव सिंधीया यांनी केली होती. देशातील सागरी मार्गावर ब्रिटीशांचं नियंत्रण असताना हे जहाज चालवण्यात आल्यानं हा प्रयत्न ऐतिहासिक ठरला. त्यामुळे राष्ट्रीय सागरी दिन हा 5 एप्रिलला साजरा करण्यात येतो.

कधी साजरा करण्यात आला पहिला राष्ट्रीय सागरी दिन : सागरी क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो. देशात पहिल्यांदा 5 एप्रिल 1964 रोजी पहिला राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन देशभरातील बंदरांवर साजरा केला जातो. राष्ट्रीय सागरी दिनाच्या कार्यक्रमातून भारताच्या सागरी क्षेत्राची उदात्तता, त्याचं महत्त्वपूर्ण योगदान आणि सागरी क्षेत्राला भेडसावणाऱ्या आव्हानांबाबत जागरुकता पसरवण्यासाठी जनजागृती केली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 'मर्चंट नेव्ही ध्वज': सागरी क्षेत्रात महत्वपूर्ण योगदाल देण्याऱ्या खलाशांना केंद्र सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाकडून सन्मानीत करण्यात येते. मागील महिन्यात 29 मार्च ते 5 एप्रिल या आठवड्यात सरकारनं सागरी सप्ताह साजरा केला. या दरम्यान विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खलाशांना 'मर्चंट नेव्ही ध्वज' देऊन सन्मानित केलं.

हेही वाचा :

  1. National Maritime Day 2023 : वाफेवर चालणार्‍या पहिल्या जहाजाने मुंबईवरुन ब्रिटनकडे केली होती कूच; जाणून घ्या सागरी दिनाचा इतिहास
  2. 'अटल सेतू'मुळं फेरी बोट चालकांना बसणार फटका? जाणून घ्या कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.