हैदराबाद National Friendship Day 2024 : मैत्रीचं नातं हे सगळ्या नात्यापेक्षा पवित्र मानलं जाते. त्यामुळेच मैत्री दिनाचं महत्व विषद करण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार राष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या मित्रांप्रती राष्ट्रीय मैत्रीदिनी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज देशभरात राष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय मैत्री दिनाचं महत्व, त्याचा इतिहास याबाबतची माहिती आपण यालेखातून जाणून घेऊ.
काय आहे मैत्री दिनाचा इतिहास : मित्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन अमेरिकेत जन्मलेल्या मित्रांच्या सन्मानार्थ 1935 मध्ये दक्षिण आशियात या दिवसाचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला. त्यानंतर 1958 मध्ये जॉयस हॉल यानं पॅराग्वेमध्ये पहिल्यांदा फ्रेंडशिप डेचा प्रस्ताव मांडला. अगोदर मैत्री दिनाची जागतिक स्तरावर सुटी देऊन मैत्री साजरी करण्यात येत होती. जागतिक मैत्री दिनाची मूळ तारीख अगोदर 2 ऑगस्ट होती. मात्र अमेरिकेतील बदलांमुळे ती 7 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. मैत्री दिनाचा सन्मान करण्यासाठी 1998 मध्ये नाने अन्नान यांनी विनी द पूह यांना संयुक्त राष्ट्र संघातील मैत्रीचे जागतिक राजदूत म्हणून नियुक्त केलं. या घडामोडीत जागतिक मैत्री दिनाची कल्पना अगोदर 20 जुलै 1958 मध्ये डॉ. रॅमन आर्टेमियो ब्राचो यांनी प्यूर्टो पिनास्को, पॅराग्वे इथं मांडली. जागतिक मैत्री दिनाची संकल्पना मांडताना रंग, भेद, वंश, धर्म याचा विचार न करता, सर्व मानवांमध्ये मैत्री असावी, असा त्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघानं 30 जुलै हा जागतिक मैत्री दिन म्हणून साजरा करण्याचं 2011 ला घोषित केलं. मात्र भारत, बांगलादेश आदी देशात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी राष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यात येतो.
काय आहे राष्ट्रीय मैत्री दिनाचं महत्व : राष्ट्रीय मैत्री दिन हा आपल्या जीवनातील मित्राचं महत्व अधोरेखित करते. आपल्या मैत्रीची कदर करुन त्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्यात येतो. विशेष म्हणजे जात, धर्म, रंग, वंश याच्या पलिकडं जाऊन केवळ मित्रांसाठी या दिनी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यामुळे मानवी जीवनात आपलेपणा आणि समजूतदारपणाची भावना वाढीला लागते.
हेही वाचा :