ETV Bharat / bharat

श्रावण सोमवारनिमित्त सिद्धनाथ मंदिरात भाविकांची तुफान गर्दी; चेंगराचेंगरीत 7 भाविक ठार, 9 गंभीर - Devotees Died In Jehanabad Stampede - DEVOTEES DIED IN JEHANABAD STAMPEDE

Devotees Died In Jehanabad Stampede : जहानाबाद इथल्या मखदुमपूर टेकडीवर असलेल्या सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या 7 भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. या चेंगराचेंगरीत अन्य 9 भाविक गंभीर जखमी झाले. श्रावण सोमवारनिमित्त हे भाविक दर्शनासाठी रविवारी रात्रीपासूनच मंदिरात ठाण मांडून बसले होते.

Devotees Died In Jehanabad Stampede
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 8:11 AM IST

Updated : Aug 12, 2024, 8:48 AM IST

पाटणा (बिहार) Devotees Died In Jehanabad Stampede : श्रावण सोमवारनिमित्त भाविकांनी मंदिरात केलेल्या तुफान गर्दीमुळे मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत तब्बल 7 भाविकांचा मृत्यू झाला. तर 9 भाविक गंभीर जखमी झाले. ही घटना बिहारमधील जहानाबाद इथल्या मखदुमपूर टेकडीवर असलेल्या सिद्धनाथ मंदिरात आज पहाटे घडली. हे सगळे भाविक श्रावण सोमवारनिमित्त सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. मात्र यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत त्यांना आपला जीव गमवावा लागला. जलाभिषेक करण्यासाठी गर्दीतील भाविकांची तुफान गर्दी लोटल्यानं ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी (Source : ETV Bharat)

सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरीत 7 भाविकांचा मृत्यू : बिहार इथल्या सिद्धनाथ मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त आलेल्या भाविकांची मंदिरात तुफान गर्दी झाली. या गर्दीत जलाभिषेक करण्यासाठी लोटपाट झाल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यात चेंगराचेंगरीत तब्बल 7 भाविकांचा मृत्यू झाला. तर 9 भाविक गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री 12 वाजतापासूनचं भाविकांनी दर्शन आणि जलाभिषेकासाठी मंदिरात तुफान गर्दी केली.

गर्दीमुळं मंदिरात एकच गोंधळ उडाला : "सोमवार असल्यानं भाविकांची मोठी गर्दी झाली होती. बाबा सिद्धनाथांच्या दर्शनासाठी पतला गंगा, गौघाट मार्गे मोठ्या संख्येने भाविक डोंगरावर पोहोचले. त्यामुळं मंदिराजवळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर अचानक लोक इकडे तिकडे धावू लागले. त्यामुळं अनेक महिलांचा पडून जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेकांना गंभीर दुखापतही झाली आहे. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे," अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

35-50 जणांच्या मृत्यूची भीती : दरम्यान, स्थानिक नागरिक कृष्ण कुमार यांनी 35-50 जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली आहे. ते म्हणतात, 'सुमारे 35 ते 50 जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती आहे. एका रुग्णवाहिकेतून मृतदेह आणले जात आहेत. तसंच एका वाहनात 12 मृतदेह असल्याची माहिती मिळाली आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. या घटनेला पोलीस प्रशासन जबाबदार आहे."

हेही वाचा - दुसऱ्या श्रावण सोमवारी महादेवाला वाहा 'ही' शिवमूठ; वाचा सविस्तर - Second Shravan Somwar

Last Updated : Aug 12, 2024, 8:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.