आग्रा : एयर होस्टेस होण्यासाठी आग्र्यात आलेल्या तरुणीला समाजवादी पक्षाच्या युवा नेत्यानं लिव्ह इनमध्ये ठेवत बलात्कार केल्यानं खळबळ उडाली. या युवा नेत्यानं तरुणीचा गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पक्षानं या युवा नेत्याची हकालपट्टी केली असून या तरुणीवरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गुर्जर असं त्या समाजवादी पक्षाच्या नेत्याचं नाव आहे. पीडित तरुणी मैनपुरीची रहिवासी आहे. सपा नेत्यानं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ठेवून गैरफायदा घेत तिच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोपही पीडितेनं केला. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आता राहुल गुर्जरवर गुन्हा दाखल केला आहे.
एयर होस्टेस होण्यासाठी आली शहरात : पीडितेनं शहर पोलीस उपायुक्त सूरज राय यांना सांगितलं की, "ती एअर होस्टेसचा कोर्स करण्यासाठी 2012 मध्ये मैनपुरीहून आग्रा इथं आली. तिनं एका संस्थेत प्रवेश घेतला. या काळात तिची ताजगंज पोलीस ठाण्याच्या परिसरातील मारुती सिटीमध्ये राहणाऱ्या राहुल गुर्जर याच्याशी भेट झाली. दोघंही फोनवर बोलू लागले. मैत्रीनंतर राहुल गुर्जरनं लग्नाचं आमिष दाखवून तिचं शारीरिक शोषण केलं. मागील अनेक वर्षांपासून लिव्ह इनमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. यादरम्यान पीडिता गर्भवती राहिल्यानंतर फसवणूक करून गर्भपात केला."
पीडितेला मारहाण करुन धमकावलं : पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, "गर्भपात केल्यामुळे आमच्यात भांडण झालं. यानंतर आरोपीनंमारहाण सुरू केली. मी लग्नासाठी दबाव टाकला असता त्यानं मला धमक्या दिल्या. त्यामुळे माझा छळ आणखी वाढला. समाजवादी पक्षाचा नेता असल्यानं त्यानं आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन ऑगस्ट 2024 मध्ये माझ्याविरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला."
पीडितेवर दाखल झाला खंडणीचा गुन्हा : आरोपी राहुल गुर्जर यानं ऑगस्ट 2024 मध्ये पीडितेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. पीडिता हॉटेलमध्ये काम करायची, असा आरोप त्यानं केला. "मला अडकवून व्हिडिओ आणि फोटो काढले. त्या आधारे मला ब्लॅकमेल करून 6.77 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी ताजगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी कोणत्याही हॉटेलमध्ये काम केलं नाही, असा पीडितेचा आरोप आहे. हॉटेल व्यवस्थापनानं याबाबत छट्टा पोलीस ठाण्यात राहुल गुर्जर याच्याविरोधात तक्रार दाखल केली. मी आरोपींच्या छळाची तक्रार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडं केली. त्यामुळे पक्षानं राहुल गुर्जर याची सपामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली."
नराधमाची समाजवादी पक्षातून हकालपट्टी : आरोपी राहुल गुर्जर हा समाजवादी पक्षाच्या लोहिया वाहिनीचा जिल्हाध्यक्ष आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे महानगर अध्यक्ष वाजिद निसार यांनी सांगितलं की, "राहुल गुर्जर याची जुलै 2024 मध्ये लोहिया वाहिनी जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तरुणीनं त्याच्याविरुद्ध तक्रार केली. आता त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही." पोलीस उपायुक्त सूरज राय यांनी सांगितलं की, "पीडितेच्या तक्रारीवरुन ताजगंज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात पुराव्याच्या आधारे कारवाई करण्यात येईल."
हेही वाचा :