ETV Bharat / bharat

पुणे हिट अँड रन प्रकरणात कोणालाही सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा काशीत 'एल्गार' - Devendra Fadnavis Visit To Varanasi

Devendra Fadnavis Visit To Varanasi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वाराणसीत भेट दिली. यावेळी त्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात सहभागी होऊन काशी आणि प्राचिन महाराष्ट्राची संस्कृती यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पुणे हिट अँड रन प्रकरणी कोणालाही सोडणार नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis Visit To Varanasi
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 10:04 AM IST

पुणे हिट अँड रन प्रकरणात कोणालाही सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा काशीत 'एल्गार' (ETV Bharat)

लखनऊ Devendra Fadnavis Visit To Varanasi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी वाराणसीतील जंगंबरी मठात पोहोचले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात सहभागी होत महाराष्ट्राच्या प्राचिन सांस्कृतिक विषयांवर चर्चा केली. पुणे पोर्श हिड आँड रन प्रकरणावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. पुणे हिट अँड रन प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही सोडण्यात येणार नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Devendra Fadnavis Visit To Varanasi
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)

काशीतील मराठी कुटुंबांची भेट : माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काशी इथं एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या अंतर्गत काशीत राहणाऱ्या मराठी कुटुंबांना भेटण्याची संधी मिळाली. या 2000 वर्ष जुन्या मठात जाण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे," असं ते म्हणाले.

काशीतील मराठी माणूस पंतप्रधान मोंदीसोबत : काशीत राहणारा मराठी माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. "या मराठी माणसांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे त्यांचं पंतप्रधान मोदींवरील प्रेम दिसून येते. मला असं वाटते की आपण काशी आणि महाराष्ट्राचं नातं पुन्हा समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या मताधिक्यानं जिंकणार आहेत. इथली लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खूप प्रेम करतात."

पुणे हिट अँड रन प्रकरणात कोणालाही सोडणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाराणसीत पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरही भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पुणे हिट अँड रन प्रकरणात महाराष्ट्र सरकार चांगली कारवाई करत आहे. पुण्यात घडलेल्या घटनेनंतर मी तातडीनं तिथं जाऊन बैठक घेतली. आम्ही कोणालाही सोडणार नाही, असं मी म्हटलं होतं. आम्ही सातत्यानं या प्रकरणाच्या मुळाशी जात आहोत. प्रत्येक व्यक्तीचा मुखवटा काढण्याचं काम केलं जात आहे. या घटनेत कोणाचा हात आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. आम्ही कोणालाही सोडणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. "गांजा ओढून लेख लिहितात"; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला - Devendra Fadnavis On Sanjay Raut
  2. केतन तिरोडकर यांना अटक ; ड्रग्ज माफियांवरुन देवेंद्र फडणवीसांवर केले होते गंभीर आरोप - Ketan Tirodkar Arrested
  3. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ॲक्शन मोडवर, ससूनमधील 'त्या' दोन्ही डॉक्टरांवर कारवाई - डॉ. विंकी रुघवानी - Pune hit and run case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.