नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा निवडणूक 2024 साठी रायबरेली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर अमेठी लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षानं आपला उमेदवार बदलला आहे. अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून रायबरेली आणि अमेठी मतदार संघात उमेदवारी जाहीर होत नसल्यानं विरोधकांकडून काँग्रेसवर टीका होत होती.
राहुल गांधी लढणार रायबरेली मतदार संघातून निवडणूक : लोकसभा निवडणूक 2024 चे दोन टप्पे पार पडले आहेत. तरी काँग्रेसकडून अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली नव्हती. यामुळे विरोधकांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. एनडीएच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसकडं उमेदवार नाहीत, असा प्रचार विरोधकांकडून सुरू होता. मात्र आज काँग्रेसनं राहुल गांधी यांची रायबरेली मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली. तर अमेठी मतदार संगातून किशोरीलाल शर्मा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
प्रियंका गांधी निवडणूक लढवण्याची चर्चा विरली हवेत : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा या रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा करण्यात येत होती. तर राहुल गांधी हे अमेठी मतदार संघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा मोठ्या जोरात करण्यात येत होती. मात्र प्रियंका गांधी वाड्रा यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रायबरेली मतदार संघातून राहुल गांधी यांना उमेदवारी देण्यात आली, तर अमेठी मतदार संघातून किशोरीलाल शर्मा यांना मैदानात उतरवण्यात आलं.
हेही वाचा :
- शरद पवारांनी बारामती वाचवून दाखवावी; बावनकुळेंचं थेट आव्हान - Lok Sabha Election 2024
- पालघरमध्ये शिंदेंना धक्का! विद्यमान खासदाराचा पत्ता कट करत भाजपानं 'या' नेत्याला दिलं तिकीट - Palghar Lok Sabha 2024
- राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघ ठरवणार खरी शिवसेना कोणाची? 'या' मतदारसंघात दोन शिवसैनिक आमनेसामने - shivsena against shivsena