ETV Bharat / bharat

भाजपानं लोकसभा निवडणुकीत उघडलं विजयाचं खातं; '400 पार'ला 399 बाकी - Mukesh Dalal Wins - MUKESH DALAL WINS

BJP candidate Mukesh Dalal Wins : लोकसभा निवडणुकांचे सात टप्पे आहेत. यातील मतदानाचा एक टप्पा झाला आहे. मात्र, संपूर्ण निवडणूक होण्याआधीच भाजपाचा एक उमेदवार विजयी झालाय. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर बातमी....

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 22, 2024, 5:18 PM IST

Updated : Apr 22, 2024, 6:30 PM IST

विजयी उमेदवार मुकेश दलाल

गांधीनगर (गुजरात) BJP candidate Mukesh Dalal Wins : गुजरातमध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उमेदवार बिनविरोध विजयी झालाय. सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, तर एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यामुळं आता सुरत लोकसभा निवडणूक 2024 वर मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले आहेत.

दलाल कसे झाले विजयी? : झालं असं की, सुरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाला तर दुसरीकडं 'बसपा'च्या उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळं भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांचा मतदानाआधीच बिनविरोध विजय झालाय. विजयाबद्दल गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी त्यांचं अभिनंदन केलं.

गुजरात भाजपामध्ये जल्लोष : मुकेश दलाल यांना विजयाचं प्रमाणपत्रही मिळालं आहे. मुकेश दलाल हे सुरतमधील भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. ते सुरत भाजपाचे सरचिटणीस आहेत. दलाल यांच्या विजयानंतर गुजरात भाजपामध्ये आनंदाचं वातावरण आहे. दलाल यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, पेढे वाटत जल्लोष साजरा केला. दलाल यांच्या रुपानं भाजपानं लोकसभा निवडणुकीत विजयाचं खातं उघडलं आहे.

सुरत लोकसभा भाजपाकडं : 'बसपा'च्या प्यारेलाला भारती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. याशिवाय सर्व उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळं मुकेश दलाल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. मुकेश दलाल यांच्या विजयाबद्दल सीआर पाटील यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, "सुरतनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिलं विजयाचं कमळ दिलंय." 1989 पासून सुरतची जागा भाजपा जिंकत आली आहे. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. उद्योगाच्या दृष्टिकोनातून सुरत महत्त्वाचं शहर जाते.

हेही वाचा -

  1. आदित्य ठाकरे 'ईटीव्ही'शी संवाद साधणार अन् तेवढ्यात स्टेज कोसळलं; किरकोळ दुखापत - aaditya thackeray stage collapsed
  2. "अमरावतीकरांनो माफ करा, पाच वर्षांपूर्वी माझी चूक झाली", असं का म्हणाले शरद पवार? - Sharad Pawar
  3. नवनीत राणांविरोधात उद्धव ठाकरेंनी थोपाटले दंड; म्हणाले, 'बदला घेणारच' - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 22, 2024, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.