ETV Bharat / bharat

'मम्मी-पप्पा, मी जेईई करू शकत नाही, मला माफ करा'; परीक्षेच्या आधी कोटामध्ये 18 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

Kota Student Suicide : कोटामध्ये 'जेईई'ची तयारी करत असलेल्या एका 18 वर्षीय मुलीनं सोमवारी (29 जानेवारी) सकाळी आत्महत्या केली. तिनं तिच्या सुसाईड नोटमध्ये पालकांची माफी मागितली आहे. या महिन्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.

Suicide
Suicide
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 6:36 PM IST

कोटा (राजस्थान) Kota Student Suicide : राजस्थानमधील कोटा येथे अनेक कोचिंग क्लास घेतले जातात. देशभरातील विद्यार्थी येथे क्लासेससाठी येत असतात. मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन मोठं व्हावं या हेतूनं पालकही लाखो रुपये फी भरून आपल्या मुलांना कोटा येथे पाठवतात. मात्र, अभ्यासाचं टेन्शन, परीक्षेचा दबाव यामुळं कोटामध्ये विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं चित्र मागील काही वर्षापासून वाढत चाललं आहे. अशीच एक घटना कोटामध्ये सोमवारी घडली.

मुलीची आत्महत्या : राजस्थानमधील कोटा येथे 'आयआयटी जेईई'ची तयारी करणाऱ्या आणखी एका मुलीनं आत्महत्या केली आहे. या मुलीची परीक्षा दोन दिवसांवर आली होती. त्या मृत मुलीच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली असून त्यात तिनं परीक्षेच्या दबावाचा उल्लेख केला आहे. या घटनेमुळं तिच्या पालकांना धक्काच बसलाय. अवघ्या 18 वर्षाच्या या मुलीच्या आत्महत्येनं कोटामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं : कोटा येथील कोचिंग क्लासमध्ये 'जेईई मेन'ची तयारी करणाऱ्या या 18 वर्षीय मुलीनं तिच्या घरातील खोलीत आत्महत्या केली. 31 जानेवारीला तिची परीक्षा होती. मिळालेल्या माहितीनुसार, कोचिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर ती घरुनच परीक्षेची तयारी करत होती. आत्महत्या करण्यापूर्वी मुलीनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं, "आई-बाबा, मी 'जेईई' करू शकत नाही. म्हणून मी आत्महत्या करत आहे. मी फार वाईट मुलगी आहे. मला माफ करा. हा शेवटचा पर्याय होता".

अनेक दिवस तणावाखाली होती : सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मुलीच्या चुलत भावानं सांगितलं की, गेल्या वर्षी ती 12वी ची परीक्षा कमी गुणांसह उत्तीर्ण झाल्यामुळं अनेक दिवस तणावाखाली होती. कुटुंबियांनी सांगितलं की, ती जवळपास 6 ते 7 तास अभ्यास करत होती. मुलीचे वडील स्थानिक बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. ही मुलगी तीन बहिणींमध्ये सर्वात मोठी होती. त्यामुळं घरची परिस्थितीही खूप चांगली नव्हती.

या वर्षातील दुसरी घटना : कोटामध्ये गेल्या वर्षी परीक्षेच्या भीतीनं 30 विद्यार्थ्यांनी आपला जीव दिला होता. या वर्षात आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 24 जानेवारीला 'नीट'ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यानं परीक्षेच्या भीतीनं आत्महत्या केली होती.

(आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कोणीही उचलू नये, मित्र, परिवार यांच्यासोबत मनमोकळेपणानं चर्चा करा आणि त्यातून मार्ग निघेल)

हे वाचलंत का :

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.