श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. निष्पक्ष आणि शांततेत मतदान व्हावे यासाठी जम्मू काश्मीरमधील सर्व संवेदनशील भागात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
Live updates-
जम्मू आणि काश्मीरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 26.72% मतदान झाले.
मतदानाचे असे आहे प्रमाण
- अनंतनाग- 25.55%
- डोडा- 32.30%
- किश्तवार-32.69%
- कुलगाम-25.95%
- पुलवामा - 20.37%
- रामबन-31.25%
- शोपियान-25.96%
Jammu and Kashmir 1st phase Assembly elections: 26.72% voter turnout recorded till 11 am in Jammu and Kashmir, as per the Election Commission of India
— ANI (@ANI) September 18, 2024
Anantnag-25.55%
Doda- 32.30%
Kishtwar-32.69%
Kulgam-25.95%
Pulwama-20.37%
Ramban-31.25%
Shopian-25.96% pic.twitter.com/VRFWB182rp
विधानसभा निवडणुकीकरिता आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदारांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करण्यात येणार आहे. केंद्रशासित प्रदेशात 23.27 लाखांहून अधिक मतदार आज लोकशाहीने दिलेला सर्वात महत्त्वाचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या मतदारसंघाकरिता निवडणूक- पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील सात जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 219 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर काश्मीर विभागात 16 मतदारसंघ आहेत. यामध्ये पंपोर, त्राल, पुलवामा, राजपोरा, जैनपोरा, शोपियान, डीएच पोरा, कुलगाम, देवसर, दुरू, कोकरनाग (एसटी), अनंतनाग पश्चिम, अनंतनाग, श्रीगुफ्वारा-बिजबेहारा, शांगस-अनंतनाग पूर्व आणि पहलगाम या मतदारसंघाचा समावेश आहे. जम्मू विभागात आठ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामध्ये इंदरवाल, किश्तवार, पद्दार-नागसेनी, भदेरवाह, डोडा, दोडा पश्चिम, रामबन आणि बनिहालचा समावेश आहे.
आज 10 वर्षांनी विधानसभा निवडणूक होत आहे. बेरोजगारी आणि महागाई संपवायची आहे, हे लक्षात घेऊन आम्ही मतदान केलं आहे. लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे अशी आमची इच्छा आहे- एक मतदार
फुटीरतावाद संपवण्यासाठी कटिबद्ध राहाडेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीने (डीपीएपी) जम्मू-काश्मीरमधील पहिल्या टप्प्यातील मतदानाबाबत जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पक्षाच्या एक्स हँडलवर म्हटलं आहे की, 'केवळ प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकारच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादमुक्त वातावरण निर्माण करू शकते. तसेच नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करू शकते. येथील विकास कामांना गती देऊ शकते. रोजगार, महिलांचे सक्षमीकरण आणि या भागातील फुटीरतावाद संपवण्यासाठी कटिबद्ध राहा. "
- आधी मतदान करा मग नाष्टा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेला, विशेषतः तरुण मतदारांना विधानसभा निवडणुकीत उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन केलं. आधी मतदान करा, मग नाष्टा करा, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
- मतदानाचं प्रमाण वाढण्याची शक्यता- लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमधील मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविताना उत्साह दाखविला होता. विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीकरिता जोरदार प्रचार केला. त्यामुळे विधानसभेतील मतदानाचे प्रमाण 58 टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये विधानसभा मतदानाची टक्केवारी 65% पर्यंत पोहोचली होती.
भाजपा स्वतंत्र तर काँग्रेसची नॅशनल कॉन्फरन्सबरोबर युती-निवडणूक लढवणाऱ्या प्रादेशिक पक्षांमध्ये जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP), पीपल्स कॉन्फरन्स (PC), जम्मू आणि काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (JKPM) आणि अपना पार्टी यांचा समावेश आहे. काँग्रेसनं नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केली. तर भारतीय जनता पक्ष स्वबळावर आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे. 2014 च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पीडीपीनं 28 जागांसह आघाडी घेतली. त्यामुळे यंदा कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.
हेही वाचा-