ETV Bharat / bharat

महिला दिन विशेष : पुरुषी वर्चस्व असणाऱ्या कबड्डी खेळातील प्रो कबड्डी संघाच्या एकमेव महिला मालकीण राधा कपूर - International Women Day

International Womens Day : राधा कपूर या एकमेव महिला आहेत ज्या पुरुषांचं वर्चस्व असलेल्या कबड्डीसारख्या खेळातील प्रो कबड्डी लीगमधील संघाच्या मालकीण आहेत. पुरुषांच्या या खेळात त्या महिला शक्तीचं प्रतिनिधित्व करताना दिसताय. महिलांना विशेषत: मुलींना कबड्डी खेळाची आवड निर्माण करण्यावर आता आमचा भर असल्याचं राधा कपूर यांनी सांगितलं.

International Women's Day
International Women's Day
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 3:22 PM IST

International Womens Day : कबड्डी खेळ पुरुषांचा समजला जातो. या खेळाकडं महिलांनी देखील दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय. मात्र, असं असताना देखील प्रो कबड्डी लीगच्या एकमेव महिला संघ मालक राधा कपूर यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राधा कपूरवर यांच्याबद्दल जाणून घेऊया.

क्रीडा जगतात पुरुषांचं वर्चस्व असताना देखील कबड्डी लीगच्या एकमेव महिला संघ मालक राधा करपू यांचा बोलबाला आहे. येस बँकेचे एमडी-सीईओ डॉ. राणा कपूर यांची 29 वर्षीय मुलगी राधा कपूरनं प्रो कबड्डी लीगमध्ये दबंग दिल्ली संघ विकत घेतल्यानंतर त्यांनी हॉकी इंडिया लीगमध्ये मुंबईचा संघ विकत घेतला आहे. खेळात पुरुषांचा दबदबा असतानाही त्यांनी आपला मोर्चा खेळाकडं वळवला. यासाठी राधा कपून यांना अनेक अडथळे आले. त्यांच्यासाठी खेळाच्या क्षेत्रात काम करण्याचं आव्हान होतं. मुलगी असल्यामुळं माझ्याकडं वेगळ्या नजरेनं बघितलं जायचं असं, राधा कपूर सांगतात.

"वडील जेव्हा कधी पैशाबद्दल बोलत होते, तेव्हा मला काहीच समजत नव्हते. त्यामुळं लहान वयातच मी दुसऱ्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासून शाळेत कबड्डी खेळले. मी घरी कबड्डीमध्ये कुटुंब, मित्रांसह सहभागी होत असे. मी चित्रकला, पियानो देखील शिकले. सात वर्षे भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं. दिल्ली, मुंबईत स्टेज शो केले. जेव्हा व्यावसायिक अभ्यासाक्रमाची वेळ आली, तेव्हा मी न्यूयॉर्कच्या पार्सन्स स्कूलमधून डिझायनिंग शिकले. त्यानंतर भारतात परतल्यावर ड्युएट क्रिएशन्स कंपनी सुरू केली'. - राधा कपूर

"व्यक्तींना सशक्त करण्यासाठी आणि विशेषत: कमी विशेषाधिकारप्राप्त पार्श्वभूमीतील समुदायांचं उत्थान करण्यासाठी खेळाच्या सामर्थ्यावर माझा नेहमीच विश्वास आहे. कबड्डी हा खरा भारतीय खेळ असल्यानं, आमच्या समृद्ध भारतातील क्रीडा वारसा दाखवण्यासाठी मी या खेळाची निवड केली. खेळाला अधिक लोकप्रियता मिळवून देण्यासाठी कबड्डीला जागतिक स्तरावर कसं नेता येईल, यासाठी मी प्रयत्न केले'.

क्रिकेट किंवा बॅडमिंटनमधील अधिक प्रस्थापित क्रीडा संघांपेक्षा कबड्डीवर लक्ष केंद्रित करण्याचा कपूरचा निर्णय सहासी होता. त्यामुळं अनेक खेळाडूंना कबड्डी खेळण्याची संधी मिळाली. तळागाळातील खेळाडूंना यातून प्रोत्साहन मिळालं. त्यामुळं त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाले. कबड्डी आज जिथं आहे, तिथं नेण्यासाठी खूप पाठबळाची गरज होती. अजून खूप काम करावं लागेल, पण टीम ओनर म्हणून आता एक इकोसिस्टम तयार झाली आहे. करिअर घडवण्याच्या दृष्टीनं या खेळाकडं आम्हाला लक्षपूर्वक पाहण्याची गरज आहे.

आपल्या भविष्यातील योजनांची माहितीही कपूर यांनी दिली 'मला काहीतरी नवीन करायचं होतं, काहीतरी बदल घडवता येईल. कबड्डीने केवळ खेळाला चालना दिली नाही, तर तळागाळातील प्रतिभावंत खेळाडूंचं जीवन उंचावण्याची संधीही दिली आहे. कबड्डीचा हा टप्पा गाठण्यासाठी खूप पाठबळ हवं आहे. पण संघ म्हणून आम्ही आता यंत्रणा तयार केली आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये माझ्याशिवाय संघाची दुसरी मालकीण महिला नाही. याशिवाय व्यवस्थापन, फिजिओथेरपिस्टमध्येही महिला नाहीत, असं त्यांचं मत आहे. कबड्डीमधील तरुण प्रतिभावंत खेळाडूंना विकसित करणं तसंच कबड्डी लीगसाठी अकादमी स्थापन करणं त्यांचं उद्दिष्ट असल्याचं राधा यांनी म्हटलंय. यासोबतच महिलांसाठी खेळांचाही विस्तार करण्याची त्यांची कल्पना आहे.

हे वाचलंत का :

  1. Womens Day 2024 : एचआयव्ही बाधित असूनही शालिनीताई बनल्या आधारवड, वाचा प्रेरणादायी स्टोरी
  2. Womens Day 2024: सायबर क्राईमपासून महिलांचा बचाव करण्यासाठी धडपडतेय 'रणरागिणी'
  3. Womens Day 2024 : अत्याचारित, पीडित महिलांसाठी कायदेशीर लढा देणारी कायदेतज्ञ 'रणरागिणी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.