ETV Bharat / bharat

भारतीय नौदलाची 24 तासांत दुसरी यशस्वी कारवाई, युद्धनौका पाठवून दाखवली ताकद

भारतीय नौदलाने सोमवारी सोमालियाच्या पूर्व किनाऱ्यावर आणि एडनच्या आखातावर हल्लेखोरांच्या विरोधात ऑपरेशन मोहिम राबवली. त्यामध्ये 24 तासांत हल्लेखोरांच्या तावडीतून 19 पाकिस्तानींची सुटका केली.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 12:15 PM IST

भारतीय नौदलाची 24 तासांत आणखी एक यशस्वी कारवाई

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने 28 आणि 29 जानेवारी रोजी अरबी समुद्रात हल्लेखोरांकडून होणाऱ्या मोठ्या अपहरणाचे प्रयत्न अवघ्या 24 तासांत हाणून पाडले आहेत. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदल युद्धनौका (INS) सुमित्राच्या माध्यमातून रविवारी एफव्ही इमान या इराणी जहाजाची सुटका केल्यानंतर सुमित्राने दुसऱ्या ऑपरेशनमध्ये अल नैमी या जहाजाची सोमालियन हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. या कारवाईत भारतीय सागरी कमांडोनेही भाग घेतल्याचं वृत्त आहे.

कडक दक्षता बाळगली : ही घटना केरळच्या कोचीच्या किनाऱ्यापासून 800 मैल दूर अरबी समुद्रात घडली आहे. समुद्री हल्लेखोरांनी इराणचा ध्वज असलेले जहाज आणि त्यातील क्रू सदस्यांना ओलीस ठेवलं. यानंतर भारतीय नौदलाने आपली युद्धनौका आयएनएस सुमित्रा पाठवून सर्वांना सुखरूप बाहेर काढलं. अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, "जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारताने हिंद महासागरात सर्वत्र कडक दक्षता बाळगली आहे."

हल्लेखोरांच्या पलायनाची खात्री : भारतीय नौदलाने एक निवेदन जारी केलं आहे. त्यामध्ये 29 जानेवारी रोजी अल-नईमीच्या सुटकेसाठी ऑपरेशन केलं. विमानातील सर्व 19 क्रू मेंबर्स पाकिस्तानी नागरिक आहेत. जहाजाला वेढा घातल्यानंतर, मरीन कमांडोजनी ऑपरेशन केलं. तसंच, जहाजातून हल्लेखोरांच्या पलायनाची खात्री केली.

मासेमारी जहाजात 19 पाकिस्तानी प्रवासी होते : भारतीय नौदलाने एका निवेदनात म्हटलं आहे की, नौदल जहाज सुमित्रा सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ आणखी एक यशस्वी हल्लेखोरविरोधी ऑपरेशन केलं आहे. भारतीय नौदलाने 11 सोमाली हल्लेखोरांपासून मासेमारी जहाज अल नामी आणि त्याच्या क्रूची सुटका केली आहे. या जहाजावर 19 पाकिस्तानी नागरिकही होते.

एक दिवसापूर्वी इराणी जहाज वाचवण्यात आलं होतं : एक दिवस आधी भारतीय नौदलाने यशस्वी ऑपरेशन केलं होतं. भारतीय नौदलाची युद्धनौका INS सुमित्रा हिने सोमाली हल्लेखोरांचं अपहरण केलेल्या मच्छिमारांची सुटका केली होती. इराणी जहाजाचं अपहरण केलं होतं.

हेही वाचा :

1 रॉल्स रॉयस कार्सच्या किंमतीचा रेडा! 24 तास एसी अन् टीव्ही पाहण्याचीही सोय, थाट पाहून तुम्हीही व्हाल थक्क

2 डॉक्टर दाम्पत्याचं कडाक्याचं भांडण, रागात फ्लॅट पेटवणाऱ्या महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल

3 मुंबई पोलिसांनी कुख्यात ड्रग्ज तस्करांना ठोकल्या बेड्या, 11 तस्कराकडून 2 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.