ETV Bharat / bharat

मानवी तस्करी सायबर फ्रॉड प्रकरण : एनआयएची देशभरात छापेमारी, 5 आरोपींना ठोकल्या बेड्या - Human Trafficking And Cyber Fraud

Human Trafficking And Cyber Fraud Case : मानवी तस्करी आणि सायबर फ्रॉड प्रकरणात एनआयएनं देशभरात छापेमारी केली आहे. या छाप्यात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही एनआयए आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमानं तपासणी सुरू आहे.

Human Trafficking And Cyber Fraud Case
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat Marathi)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 11:16 AM IST

नवी दिल्ली Human Trafficking And Cyber Fraud Case : मानवी तस्करी आणि सायबर फ्रॉड प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं ( NIA ) देशभरात छापेमारी सुरू केली. या प्रकरणात आतापर्यंत 5 संशयित आरोपींना अटक केली आहे. ही छापेमारी स्थानिक पोलीस दल आणि एनआयएच्या संयुक्त पथकाकडून करण्यात येत आहे. देशातील तब्बल 15 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात येत आहे. यात महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, पंजाब आदी ठिकाणांवर शोधमोहीम सुरू आहे. याप्रकरणी एनआयएच्या पथकानं वडोदऱ्यातून मनीष हिंगू, गोपालगंजवरुन पहलद सिंग, दिल्लीतून नबियालम रे, गुरुग्राममधून बलवंत कटारिया आणि चंदीगडमधून सरताज सिंग यांना अटक केली आहे.

एनआयएकडून देशभरात छापेमारी : मानवी तस्करी आणि सायबर फ्रॉड प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं स्थानिक पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांच्या संयुक्त विद्यमानं देशभरात छापेमारी केली. या छापेमारीत महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात, दिल्ली, हरियाणा आणि पंजाब इथं तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणात एनआयएनं मोठ्या प्रमाणात कागदपत्रं आणि डिजिटल उपकरणं, रजिस्टर, पासपोर्ट, बोगस रोजगार पत्रं आदी साहित्य जप्त केलं आहे. एनआयएच्या पथकानं आतापर्यंत 5 संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.

मानवी तस्करी प्रकरणात नवीन 8 गुन्हे दाखल : मानवी तस्करी आणि साबर फ्रॉड प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं आतापर्यंत देशभरात 15 ठिकाणी छापेमारी केली. यात राज्य पोलीस दल आणि केंद्र शासित पोलीस दलाच्या जवानांनी 8 नवीन गुन्हे दाखल केल्याची माहिती एनआयएच्या वतीनं वृत्तसंस्थेला देण्यात आली. या प्रकरणात आता 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. मोठ्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवत बेकायदेशीररित्या दुसऱ्या देशात पाठवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - high paying jobs
  2. रशियातील भारतीयांच्या मृत्यूनंतर मुंबईसह इतर शहरांतील एजंट रडारवर, सीबीआयची छापेमारी
  3. मानवी तस्करी एक कलंक! जाणून घ्या, राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिनाचं महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.