हैदराबाद- लोकशाहीत मतदार हे मतदानांमधून लोकप्रतिनिधी निवडतात. देशाच्या विकासासाठी प्रत्येक मतदारानं अमूल्य असं मतदान केलं पाहिजे. येत्या पाच वर्षांमध्ये कोण लोकप्रतिनिधी असेल, याची जनतेनं निवड करायला हवी. मात्र, त्यासाठी मतदान प्रक्रियेची माहिती प्रत्येकाला असायला हवी.
मतदारानं मतदानकेंद्रावर रांगेत उभा राहून मतदान करणं पुरेसं नाही. त्यासाठी योग्य मतदाराला मतदान होतं आहे का, याची पाहणीदेखील केली पाहिजे. त्यासाठी निवडणूक आयोगानं व्हीव्हीपॅटची (VV Pat) यंत्रणा पुरविली आहे. त्यामधून मतदाराला कोणाला मतदान होत आहे, याची खात्री करता येते. मात्र, कर्नाटकमधील मतदान प्रक्रियेत चुकीचं मतदान झाल्याची एक्स मीडियात पोस्ट केली होती. मात्र, निवडणूक आयोगानं हा दावा फेटाळला होता. निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक प्रक्रियेनं पार पडत असल्याचा दावा केला होता. तेलंगाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी विकासराज यांनी निवडणूक प्रक्रियेचा डेमो दाखविला. त्यांच्या आदेशानुसार हैदराबादमधील निझाम कॉलेजमध्ये निवडणूक प्रक्रियेचा डेमो दाखविण्यात आला. ईव्हीएम मशिन कसे काम करते, याचं प्रात्याक्षिक करून माहिती दिली. तसेच मतदान कसे झाले, याची मतदार कशी खात्री करू शकतात, याची माहिती देण्यात दिली.
मतदान केंद्रावर काय असते प्रक्रिया- मतदारानं आपलं ओळखपत्र आणि निवडणुकीच कार्ड दाखवून निवडणूक अधिकाऱ्याकडे जावं लागते. तेव्हा निवडणूक अधिकारी मतदाराचे मतदार यादीत नाव पाहून प्रक्रिया पार करतो. निवडणूक अधिकारी मतदार यादीतील मतदाराचं नाव आणि अनुक्रमांक मोठ्यानं वाचून दाखवितो. निवडणूक अधिकारी तिकिट पाहून मतदाराची सही घेतो. जर मतदार हा निरक्षर असेल तर त्याचा अंगठ्याचा ठसा घेण्यात येतो. त्यानंतर मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटावर शाईची खूण करण्यात येते. त्यानंतर मतदार हा तिसऱ्या निवडणूक अधिकाऱ्याकडं जातो. निवडणूक अधिकारी हा मतदाराचं तिकीट तपासतो. त्यानंतर कंट्रोल युनिटमधील बटन दाबून ईव्हीएम मशिनची तयारी करतो. मतदान करण्यापूर्वी तिथं हिरवी एलईडी लाईट लागलेली असते. तर मतदान केल्यानंतर लाल रंगाची एलईडी लाईट लागलेली असते. मतदान प्रक्रियेचे निरीक्षक ही प्रक्रिया पाहू शकतात.
व्हीव्हीपॅटमध्ये तिकीट पडताळणी कशी करावी- मतदार हा मतदान युनिटकडे जातो. त्या ठिकाणी हिरवी एलईडी लाईट लागलेली असते. तेव्हा मतदारानं ज्या उमेदवाराला मत द्यायचं आहे, त्याच्या नावासमोरील बटन दाबायचे असते. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या बटनासमोर हिरवी लाईट येऊन बीपचा आवाज येतो. शेजारी असलेल्या व्हीव्हीपॅट मशिनमध्ये तिकिट येते. त्यामध्ये पक्षाचे चिन्ह आणि उमदेवाराचं नाव दिसते. हे तिकिट केवळ सात सेकंदासाठी दिसते. त्यानंतर कचऱ्यात पडते. व्हीव्हीपॅटमधील तिकिटीवरून मतदाराला मतदान योग्य त्या उमेदवाराला झाले की नाही, याची खात्री करणे शक्य होते.
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सुरक्षा महत्त्वाची- मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक अधिकारी कंट्रोल युनिट बंद करतात. त्यानंतर मतदानाचे प्रमाण आणि उमदेवारांची नावे युनिटमधील स्क्रिनवर दिसतात. त्यानंतर मतदान प्रक्रिया बंद होते. पोलिंग एजंट यांच्या उपस्थितीत युनिट हे सील करण्यात येते. हे युनिट बॉक्समध्ये ठेवण्यात येतात. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांच्या आणि पोलिंग एजंटच्या सह्या घेतल्या जातात. मतमोजणी प्रक्रिया होईपर्यंत व्हीव्हीपॅट मशिन आणि कंट्रोल युनिट हे सुरक्षित ठेवले जातात.
दोन प्रकारची मतदान केंद्र कधी असतात? विधानसभा आणि लोकसभेच्या जागांकरिता निवडणूक असल्यास निवडणूक आयोगाकडून दोन वेगवेगळ्या रंगाच्या रंगीत स्लीप मतदारांना देण्यात येतात. जर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका पार पडत असतील दोन मतदान केंद्रे सुरू करण्यात येतात. या दोन्ही केंद्रावर खासदार आणि आमदारांच्या उमदेवारांना स्वतंत्र मतदान करण्यात येते.
हेही वाचा-