ETV Bharat / bharat

''पाण्यामुळं महिला घसरून पडल्या...'', सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं सत्य - Hathras Satsang Stampede - HATHRAS SATSANG STAMPEDE

Hathras Stampede : हाथरस जिल्ह्यातील सिकंदररावमध्ये भोले बाबाच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांना जीव गमवावा लागला. ही चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली? याबाबत माहिती समोर येत आहे.

Hathras Stampede
Hathras Stampede (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 10:08 AM IST

हाथरस Hathras Satsang Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव येथे भोले बाबाच्या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांना जीव गमवावा लागला. या सत्संगात चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश महिला होत्या. आतापर्यंत 109 मृतदेहांची ओळख पटली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 7 मुलांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. चेंगराचेंगरीनंतर एसडीआरएफचे पथकांकडून घटनास्थळ बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. सध्या अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू (Source - ETV Bharat Reporter)

पाण्यामुळं महिला घसरल्या : सत्संगादरम्यान झालेल्या अपघाताबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाही. एडीजी झोन ​​अनुप कुलश्रेष्ठ यांनी काही महिलांशी चर्चा केली. बाबा आपले संत असल्याचं या महिलांनी सांगितलं. स्त्रिया बाबांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी पुढे जात होत्या. पण वाटेत थोडं पाणी होतं. पाण्यामुळं काही महिला घसरून पडल्या. यानंतर इतर महिलाही पुढे सरकल्या. त्या एकमेकांवर घसरून पडू लागल्यानं चेंगराचेंगरीही झाली. हा तपासाचा विषय आहे. चौकशीनंतरच खरं कारण समोर येईल, असं ते म्हणाले.

सत्संगाच्या ठिकाणी ड्युटीवर तैनात असलेल्या महिला पोलिसांनीही गुदमरल्याची तक्रार केली आहे. या घटनेत अनेक महिला पोलिसही जखमी झाल्या आहेत. त्यांना हातरस येथील बागला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिला हेड कॉन्स्टेबल सीमा मौर्य यांनी सांगितलं की, '' मी सत्संगाच्या ठिकाणी ड्युटीवर तैनात होती. सत्संग संपल्यानंतर सर्वजण तिथून जात होते. यादरम्यान अचानक गर्दी झाली. या सत्संगात महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. महिलांना आधी बाहेर काढलं जातं होतं. यावेळी महिला एकावर एक घसरून पडू लागल्या. मुख्य रस्त्यापर्यंत मोठी गर्दी होती. यावेळी मलाही गुदमरायला सुरुवात झाली. माझ्या डोळ्यासमोर अचानक अंधार आला,'' असं महिला हेड कॉन्स्टेबलनं सांगितलं.

  • जखमींवर उपचार सुरू : उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी हातरस सत्संग दुर्घटनेत आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. याशिवाय 18 जखमींवर अलीगढ, आग्रा आणि एटा येथे उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. सरकारनं या प्रकरणाचा तपास एडीजी आणि विभागीय आयुक्तांकडे सोपवला आहे.

हेही वाचा

  1. सत्संगात चेंगराचेंगरी : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 116 भाविकांचा मृत्यू, मृतांमध्ये 109 महिलांसह 7 मुलांचा समावेश - Hathras Satsang stampede
  2. आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, १८ किलो गांजा जप्त - INTERSTATE GANJA SMUGGLING RACKET
  3. गुप्तचर विभागात नोकरी ते धार्मिक सत्संग; कोण आहेत हे भोले बाबा? 116 जणांच्या मृत्यूनंतर काढला पळ - Hathras Stampede Incident

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.