ETV Bharat / bharat

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांच्या कारवाईत मोठा खुलासा, लोकसभा निवडणुकीत नक्षलवादी हिंसाचाराची होती योजना - Naxalite camp in Maharashtra - NAXALITE CAMP IN MAHARASHTRA

Naxalite camp in Maharashtra : महाराष्ट्राच्या C60 कमांडोंनी छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर मोठी कारवाई केली. या कारवाईत नक्षलवाद्यांचा मोठा तळ उद्ध्वस्त करण्यात यश आलं. यासोबतच लोकसभा निवडणुकीदरम्यान छत्तीसगडमध्ये हल्ला करण्याचा कट नक्षलवादी रचत असल्याची माहिती समोर आलीय.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांच्या कारवाईत मोठा खुलासा, लोकसभा निवडणुकीत नक्षलवादी हिंसाचाराची होती योजना

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 1:00 PM IST

गडचिरोली/कांकेर Naxalite camp in Maharashtra : सुरक्षा दलांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केलीय. शनिवारी केलेल्या या कारवाईत नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला. माओवाद्यांच्या या छावणीत छत्तीसगडमधील कसनसूर, चितगाव दलम आणि औंधी दलम येथील नक्षलवादी राहत होते. C60 कमांडो फोर्सच्या कारवाईनंतर नक्षलवादी या कॅम्पमधून पळून गेले. त्यानंतर सुरक्षा दलाच्या पथकानं नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. या कारवाईनंतर नक्षलवादी छत्तीसगड लोकसभा निवडणुकीत हिंसाचार पसरवण्याचा कट रचत असल्याचं समोर आलंय.

चुटिनटोला गावात शोध सुरु : या कारवाईनंतर सुरक्षा दलांनी छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या चुटिनटोला गावाजवळ शोधमोहीम तीव्र केलीय. परिसरात शोध मोहिमेचा भाग म्हणून नक्षलवाद्यांच्या आणखी लपलेल्या ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. या कारवाईनंतर लोकसभा निवडणुकीच्या काळात मानपूरमध्ये नक्षलवादी घटना घडवण्याचा कट आखत होता, असं उघड झालं.

"शुक्रवारी रात्री उशिरा एक विश्वासार्ह गुप्तचर अहवाल प्राप्त झाला. या अहवालानुसार, कसनसूर चितगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र कार्यकर्ते महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील चुटिनटोला गावाजवळ तळ ठोकून आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडच्या मानपूर जिल्ह्यात विध्वंसकारी कारवाया करण्यासाठी इथं नक्षलवादी जमा झाल्याचीही माहिती मिळाली होती. त्यावर C60 कमांडोची तुकडी उंच टेकड्यांवर पोहोचली. सुरक्षा दलाच्या आगमनानंतर नक्षलवादी घटनास्थळावरुन पळून गेले. सुरक्षा दलाच्या पथकानं नक्षलवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई शनिवारी पूर्ण झाली. रविवारी दल परत आले." - नीलोत्पल, एसपी, गडचिरोली.

नक्षलवाद्यांच्या छावणीत काय सापडलं : नष्ट करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांच्या छावणीत मोठ्या प्रमाणात कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर, जिलेटिनच्या काड्या आणि बॅटरी सापडल्या. याशिवाय वॉकीटॉकी चार्जर आणि बॅकपॅकही जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

  1. Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार, अनेक ठिकाणी नक्षली चकमक
  2. छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यांचं सत्र थांबेना, भाजपा नेत्याची बेदम मारहाण करून हत्या
  3. Naxal Girl Passed 12th : जहाल नक्षली ते 12 वी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी, जाणून घ्या राजुला हिदामीची संघर्षकथा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.