पाटणा Bihar Snake Eater : सापाचं नाव ऐकताच नागरिकांची बोलती बंद होते. काही जणांना तर विषारी साप पाहून अंगात ताप भरतो. मात्र काही नागरिक सापांना पकडून त्यांच्याशी खेळतात. तर काही नागरिक विषारी सापांना शिजवून खातात, असा प्रकारही दिसून येतो. असा अनोखा छंद असलेली व्यक्ती सध्या चांगलीच चर्चेत आहेत. त्यांचं नाव मुरारी मोहन शर्मा असं आहे. विशेष म्हणजे मुरारी मोहन शर्मा हे बिहार सरकारमधील निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत.
लहानपणी मी खेकडे पकडायला गंगेच्या काठावर जायचो. एके दिवशी मी चुकून साप पकडला. त्यानं अनेकवेळा चावा घेतला, पण साप विषारी नसल्यानं काहीही झालं नाही. त्या दिवसापासून माझं मनोबल वाढलं. मला सापांबद्दल आणखी जाणून घ्यायची इच्छा होऊ लागली. मी 22 प्रकारचे 150 हून अधिक साप पकडले आहेत." - मुरारी मोहन शर्मा, माजी प्रशासकीय अधिकारी
विषारी सापांना पकडून खाणं आहे छंद : बिहारचे माजी प्रशासकीय अधिकारी मुरारी मोहन शर्मा यांनी अनेकवेळा कोब्रा आणि मण्यार हे विषारी साप पकडले आहेत. त्यांनी आतापर्यंत 20 पेक्षाही अधिक विषारी कोब्रा आणि मण्यार सापांना शिजवून खाल्लं आहे. वयोमानानुसार शरीराची चपळता कमी झाल्यानं त्यांनी आता साप पकडण्याचं धाडस सोडलं आहे. त्यांना परिसरात मोठा साप दिसला तर ते पकडण्यासाठी जातात. मात्र आता सापाला वाचवून सुखरूप सोडून देतात, अशी माहिती त्यांनी दिली.
मुरारी मोहननं कोब्रा-मण्यार सापांना बनवलं भक्ष्य : मुरारी मोहन शर्मा हे मागील 10 वर्षांपासून साप पकडण्याचं धाडस करत आहेत. 1972 मध्ये दहावी पास झाल्यानंतर त्यांनी साप पकडण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते 1981 पर्यंत साप पकडण्याचं काम करत होते. मात्र प्रशासकीय नोकरी मिळवून बिहार सरकारच्या सेवेत ते रुजू झाल्यानंतर त्यांनी साप पकडण्याचं काम सोडून दिलं. मुरारी मोहन यांनी तब्बल 20 विषारी कोब्रा आणि मण्यार सापांना खाल्ल्याचा दावा केला आहे.
जतन केलेले अनेक साप केले दान : मुरारी मोहन शर्मा सांगतात की त्यांनी "22 प्रकारचे साप पकडले आहेत. त्यांनी 150 हून अधिक वेळा साप पकडले. पूर्वी साप पकडून फॉर्मेलिन आणि ग्लिसरीनच्या द्रावणात जतन करत होतो. पण 20 वर्षांपूर्वी त्यांनी पेटीत ठेवलेले सर्व साप शाळा आणि महाविद्यालयांना दान केले. काही विज्ञान महाविद्यालयांना तर काही इतर महाविद्यालयांना दान करण्यात आले," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
8 महिन्यांपूर्वी पकडली होती घोणस : "बिहारमध्ये मण्यार प्रजातीचे 5-6 प्रकार आणि कोब्राचे तीन प्रकार आहेत. हे साप अत्यंत विषारी आहेत. याशिवाय पुराच्या दिवसात मध्य प्रदेशातून येणाऱ्या नद्यांमधून अनेकवेळा घोणस वाहत येतात. घोणस अत्यंत धोकादायक आहेत. मात्र ते इथं मिळत नाहीत. 8 महिन्यांपूर्वी पाटण्यातील लॉ कॉलेजच्या किनाऱ्यावर घोणस साप पकडला. हा पकडलेला शेवटचा साप आहे."
मुरारी मोहन यांनी पकडले 150 हून अधिक साप : मुरारी मोहन सांगतात की, "लहानपणी त्यांना सापांची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी सापांबाबतची बरीच पुस्तकं वाचली. काका डॉक्टर असल्यानं ते दर महिन्याला लंडनहून प्रकाशित होणारं मासिक मागवायचे. त्यात एक लेखक सापांवर खूप लिहित असे. लोक साप खातात अशा विविध ठिकाणांबद्दलही लिहिलं होतं. यानंतर साप खाण्याची इच्छा झाली आणि 20 वेळा कोब्रा आणि मण्यार साप पकडून खाल्ले," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :