ETV Bharat / bharat

लोकसभा अधिवेशन 2024 : आजपासून लोकसभेच्या अधिवेशनाला होणार सुरुवात, पंतप्रधानांसह नवीन सदस्यांचा होणार शपथविधी - Lok Sabha Session 2024

author img

By ANI

Published : Jun 24, 2024, 7:32 AM IST

Updated : Jun 24, 2024, 9:06 AM IST

Lok Sabha Session 2024 : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मात्र नवनिर्वाचित खासदारांचा अद्यापही शपथविधी सोहळा पार पडला नाही. आजपासून 18 व्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र या अधिवेशनात विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Lok Sabha Session 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat Marathi)

नवी दिल्ली Lok Sabha Session 2024 : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. सरकार स्थापन झाल्यानंतर आजपासून 18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होणार आहे. मात्र लोकसभेचं पहिलं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. 26 जून रोजी होणाऱ्या सभापती निवडीवरुन विरोधक एनडीए सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. NEET-UG आणि UGC-NET मधील पेपरफुटी, सभापती नियुक्तीवरुन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नवीन खासदारांचा शपथविधी : लोकसभा निवडणूक निकाल 2024 लागल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली. मात्र नवीन खासदारांचा शपथविधी अद्याप बाकी आहे. त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात त्यांना शपथ देण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारतीय जनता पक्षाचे खासदार भर्तृहरी महताब यांना लोकसभेचे प्रो-टेम स्पीकर म्हणून शपथ देणार आहेत. त्यानंतर भर्तृहरी महताब हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे नेते यांना सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा अध्यक्षांची होणार निवड : नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिल्यानंतर 26 जूनला लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 27 जूनला दोन्ही सभागृहाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदी कोणाला संधी मिळते, यावरुन सध्या बराच खल सुरू आहे.

विरोधी पक्ष आक्रमक : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपानं 234 जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएनं 293 जागा मिळवल्या आहेत. दुसरीकडं विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसलाही या निवडणुकीत चांगलं यश मिळालं. काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत 99 जागा जिंकल्या आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसनं आपल्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलावली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित अनियमितता, प्रो-टेम स्पीकर म्हणून भर्तृहरी महताब यांची निवड, यावरुन कांग्रेस आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. "ये पवन नहीं आँधी है" : नरेंद्र मोदींनी केलं जनसेना प्रमुख पवन कल्याणचं कौतुक - Pawan Kalyan
  2. आमदार, खासदारांनी वारंवार राजकीय पक्षांतरे करू नयेत - व्यंकय्या नायडू

Last Updated : Jun 24, 2024, 9:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.