चंदीगड Fire Caught In Moving Bus In Nuh : चालत्या प्रवाशी बस पेटल्यानं आगीत 8 भाविकांचा बळी गेल्यानं मोठी खळबळ उडाली. या घटनेत तब्बल 24 प्रवाशी गंभीर जखमी झाले. ही घटना पलवल एक्सप्रेस वेवर शुक्रवारी रात्री नूह इथं घडली. कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवरुन हे भाविक रात्री उशिरा जात होते. मात्र याचवेळी बसनं पेट घेतला. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली. या घटनेतील गंभीर जखमी भाविकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वृंदावनला निघाले होते पंजाब, चंदीगडचे भाविक : पंजाब आणि चंदीगडचे भाविक मथुरा आणि वंदावनला दर्शनासाठी गेले होते. मात्र मथुरा आणि वृंदावन दर्शन करुन परत येताना ही भीषण घटना घडली. या बसमध्ये तब्बल 60 भाविक होते. यात महिला आणि चिमुकल्या मुलांचाही समावेश होता. ही बस कुंडली मानेसर एक्सप्रेसवर नूह जिल्ह्यातील तवाडू शहराजवळ पोहोचल्यानंतर तिला अचानक आग लागली. या आगीत 8 भाविकांचा जळून कोळसा झाला. तर 24 भाविक होरपळून गंभीर जखमी झाले.
बस पेटल्याचं चालकाच्या लक्षात न आल्यानं गेले बळी : वृंदावनवरुन परत येताना तवाडूच्या जवळ आल्यानंतर या बसनं मागच्या बाजून पेट घेतला. त्यावेळी बस पेटल्याचं चालकाच्या लक्षात आलं नाही. याबाबत माहिती देताना बसमधील सरोज म्हणाला की, "आम्ही मथुरा आणि वृंदावनला जाण्यासाठी प्रवाशी बस भाड्यानं घेतली होती. त्यानंतर आम्ही बनारस, मथुरा आणि वृंदावन दर्शन केलं. या बसमध्ये 60 भाविकांचा समावेश होता. यात महिला आणि मुलंही आमच्या सोबत होती. आम्ही सगळे पंजाब, लुधियाणा, होशियारपूर आणि चंदीगडचे राहणारे आहोत. आम्ही सगळे नात्यातीलचं आहोत. दर्शन करुन जेव्हा आम्ही परतलो, तेव्हा रात्री उशीरा सगळे जण झोपत असताना बसच्या मागच्या बाजुला ही आग लागली. बसच्या मागं आगीचे लोळ उठले असताना चालकाला या आगीची माहिती मिळाली नाही."
शेतातील नागरिकांनी केला आरडाओरडा : तवाडू शहराच्या जवळ गेल्यानंतर बसच्या मागच्या बाजुला आगीनं घेरल्यानं रत्याच्या बाजुला असलेल्या नागरिकांनी मोठा आरडाओरडा केला. चालती बस पेटल्यानं या शेतकऱ्यांनी चालकाला याबाबत सांगण्यासाठी बसच्या मागे धावले. मात्र चालकाचं लक्ष नसल्यानं त्यानं बसं सुसाट पळवली. त्यामुळे एका तरुणानं बाईकवर बसचा पाठलाग करुन बाईक बसच्या पुढं लावून चालकाला बस थांबवण्याच्या सूचना केल्या. तेव्हा कुठं ही घटना चालकाला माहिती पडली.
नागरिकांनी आग नियंत्रणात आणण्याचा केला प्रयत्न : चालती बस आगीनं पेटल्याचं लक्षात आल्यानंतर नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी तत्काळ प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत करुन अग्मिशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांना घटनेची माहिती दिली. नागरिकांनी कळवताच तत्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थली दाखल झाले. मात्र तोपर्यंत 8 भाविकांवर काळानं घाला घातला. तर 24 भाविक होरपळून गंभीर झाले. भाविकांचा कोळसा झाल्यानं त्यांचे मृतदेह ओळखता येणं शक्य नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा :