हैदराबाद Youth Died In Pond : कर्ज काढून दुचाकी घेतलेल्या तरुणाला खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. मात्र या मारहाणीतून वाचण्यासाठी तलावात उडी मारलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना तेलंगाणातील खम्मम शहरात शुक्रवारी घडली. विनय ( 20 ) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण मूळचा आग्रा इथला असून तो मार्बलचा व्यवसाय करण्यासाठी तेलंगाणात आला होता.
कर्ज काढून घेतली होती दुचाकी : आग्रा इथून तेलंगाणातील दानाईगुडा इथं राहण्यास विनय यानं एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून दुचाकी घेतली होती. त्या दुचाकीचा वापर करुन तो मार्बलचा व्यवसाय करत होता. विनय यानं त्याचा भाऊ अजय यांनी बालेपल्ली इथल्या बांधकाम इमारतीचं मार्बल बसवण्याचं काम घेतलं होतं. या इमारतीच्या मालकाकडून 50 हजार रुपये आगाऊ घेतले होते. मात्र कामावर न गेल्यानं रागावलेल्या इमारत मालकानं त्याची दुचाकी जप्त करुन ठेवली होती. त्यामुळे विनयचा भाऊ अजय गावी परत गेला होता.
इमारत मालकाकडून आगाऊ घेतले 50 हजार रुपये : विनय यानं कर्ज काढून दुचाकी घेतली होती. मात्र मार्बल बसवण्याचं काम घेतलेल्या इमारतीच्या कामावर तो गेलाच नाही. या इमारतीच्या मालकाकडून त्यानं 50 हजार रुपये आगाऊ घेतले होते. त्यामुळे इमारत मालकानं त्याची दुचाकी जप्त करुन घेतली. दुसरीकडं खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हप्ते थकल्यावरुन त्याला हप्ते भरण्यासाठी तगादा लावला होता.
खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मारहाण : विनय आणि त्याच्या भावानं दुचाकीसाठी कर्ज काढलं होतं. मात्र या दुचाकींचं कर्ज दोघांनीही थकवलं होतं. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दोघांनाही पकडलं होतं. फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी रामचंद्र यांनी अजयकुमार आणि विनय यांना पकडून दुचाकी दाखवण्यास नेलं. यावेळी बालेपल्ली इथं गेल्यानंतर इमारतीच्या मालकानं अगोदर थकीत पैसे द्या, त्यानंतर दुचाकी देण्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे संतापलेल्या रामचंद्र यानं तिथंच असलेल्या काठीनं विनयवर हल्ला केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मारापासून वाचण्यासाठी तो पळाला. यावेळी त्याचा फायनान्सच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरुन पाठलाग केला. त्याच्यावर दगडफेक केली. त्यामुळे घाबरलेल्या विनयनं खानापुरम तलावात उडी घेतली. मात्र त्यातच त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा :