ETV Bharat / bharat

लालूप्रसाद यादवांचे निकटवर्तीय राजद नेते सुभाष यादवांना ईडीकडून अटक; काय आहे प्रकरण?

ED Arrested Subhash Yadav : ईडीनं वाळू व्यापारी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते सुभाष यादव यांना अटक केलीय. छाप्यादरम्यान त्यांच्याकडून 2 कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्याचवेळी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची बेऊर कारागृहात रवानगी करण्यात आलीय.

लालूप्रसाद यादवांचे निकटवर्तीय राजद नेते सुभाष यादवांना ईडीकडून अटक; काय आहे प्रकरण?
लालूप्रसाद यादवांचे निकटवर्तीय राजद नेते सुभाष यादवांना ईडीकडून अटक; काय आहे प्रकरण?
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 1:04 PM IST

पाटणा ED Arrested Subhash Yadav : राजद नेते तथा लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय सुभाष यादव यांना अटक करण्यात आलीय. शनिवारी रात्री उशिरा अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) त्यांना अटक केली. शनिवारी दिवसभराच्या छाप्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत बेऊर कारागृहात पाठवण्यात आलं.

छापेमारीत 2 कोटींची रोकड जप्त : शनिवारी ईडीनं सुभाष यादवांच्या 6 ठिकाणांवर छापे टाकले. या झडतीदरम्यान 2.30 कोटी रुपयांहून अधिक किमतीची रोकड आणि गुन्ह्याची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर रात्री उशिरा सुभाष यादवांना अटक करण्यात आली. यासोबतच प्रचंड संपत्तीशी संबंधित अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

सुभाष यादवांवर कारवाई का? : सुभाष यादव ब्रॉडसन लिमिटेड कंपनीत संचालक आहेत. या कंपनीवर 250 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याबाबत दानापूर येथील नारळ घाट येथील त्यांच्या निवासस्थानाव्यतिरिक्त नसरीगंज, शाहपूर, यदुवंशी नगर, मणेर येथील हल्दी, छपरा आणि पाटणा येथील गोला रोड व बोरिंग कॅनॉल रोड येथील कार्यालयांवर सकाळपासून सायंकाळपर्यंत छापे टाकण्यात आले. यापूर्वीही तपास यंत्रणेनं त्यांच्यावर छापे टाकले होते.

एफआयआरमध्ये ईडीनं काय म्हटलं? : अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलंय की, 9 मार्च रोजी ईडीनं बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकरणांसंदर्भात सुभाष यादव आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या 6 परिसरांची झडती घेतली. ईडीनं बिहार पोलिसांच्या सहकार्यानं मेसर्स ब्रॉडसन कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड (बीसीपीएल) आणि त्याच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. 20 एफआयआरच्या आधारे पीएमएलएची चौकशी सुरू करण्यात आली होती. यामध्ये ते ई-चलन न वापरता वाळूचे अवैध उत्खनन आणि विक्री करण्यात गुंतले होते, असा आरोप करण्यात आला होता.

मोठी अनियमितता उघडकीस : वाळूच्या अवैध विक्रीतून 161 कोटी रुपयांचे पीओसी तयार केल्याचं पीएमएलए अंतर्गत चौकशीत समोर आलंय. वाळूची बेकायदेशीर विक्री एका सिंडिकेटद्वारे नियंत्रित केली जाते. त्यातून आलेल्या पैसे कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यात येतात. अशा पद्धतीनं वाळूच्या अवैध विक्रीतून नफा कमविण्यात येतो. या प्रकरणात यापूर्वी, ईडीनं सिंडिकेट सदस्य राधा चरण साह, त्यांचा मुलगा आणि बीएसपीएलच्या संचालकांना पीएमएलए अंतर्गत अटक केलीय.

सुभाष लालू यादव यांचे निकटवर्तीय : वाळू व्यावसायिक सुभाष यादव हे राजद अध्यक्ष लालू यादव यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावर 2019 मध्ये झारखंडमधील चतरा येथून लोकसभा निवडणूकही लढवली आहे. मात्र, त्यांना भाजपा उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा :

  1. जनविश्वास रॅलीत पंतप्रधान मोदींविरोधात 'ते' वक्तव्य लालूंना भोवणार? भाजपा युवा मोर्चाकडून गुन्हा नोंदवण्याची मागणी
  2. बिहारच्या राजकीय संघर्षात लालू यांच्या मुलीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, भाऊ तेजस्वीचं केलं कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.