दुर्ग/रायपूर : Durg Bus Accident : छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी रात्री खाणीच्या खड्ड्यात बस पडल्यानं 12 जणांचा मृत्यू झाला. तर 14 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये खासगी कंपनीचे कर्मचारी होते. दुर्गचे पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला म्हणाले, कुम्हारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी गावाजवळ रात्री 8.30 च्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार खासगी कंपनीचे 50 हून अधिक कर्मचारी बसमधून प्रवासी करत होते. तेव्हा बस 40 फूट खोल खाणीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनास्थळी बचावकार्य सुरू केलं.
घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस केडिया डिस्टिलरी येथून रायपूर कुम्हारी रोडच्या दिशेने जात होती. त्यानंतर कुम्हारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरूम खाणीत बस 50 फूट खाली खड्ड्यात पडली. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. बचावकार्यासाठी दोन क्रेन तैनात करून जखमींना बाहेर काढण्यात आलं.
अपघाताची चौकशी करण्याचे आदेश- दुर्गचे जिल्हाधिकारी ऋचा प्रकाश चौधरी यांनी अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. खासगी कंपनीनं मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. प्रशासनाकडूनही मदत दिली जाणा आहे. अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 12 जणांना रायपूरच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले. तर इतर दोघांवर स्थानिक रुग्णालयांवर उपचार सुरू आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी जखमी लोकांच्या उपचारासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलं. त्यांनी एक्स मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटले, " जखमी लोकांच्या उपचारासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांच्या शोकमग्न कुटुंबीयांना ईश्वरानं शक्ती देवो, अशी प्रार्थना करतो."
हेही वाचा :