ETV Bharat / bharat

दोडा एन्काऊंटर : सैन्य दलाच्या जवानांकडून सलग तिसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरूच - Doda Encounter

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 2:25 PM IST

Doda Encounter : भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोडा जिल्ह्यातील देसा जंगलात सोमवारी चकमक उडाली. या चकमकीत भारतीय सैन्य दलाच्या एका कॅप्टनसह चार जवानांना वीरमरण आलं. देसा जंगलात तिसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरूच आहे.

Doda Encounter
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

जम्मू Doda Encounter : जम्मू काश्मीमधील दोडा जिल्ह्यातील देसा इथल्या जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्य दलाच्या एका कॅप्टनसह चार जवानांना वीरमरण आलं. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री पुन्हा दोन वेळा गोळीबार झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या चकमकीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. बुधवारी दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू असून तिसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती भारतीय सैन्य दलाच्या वतीनं देण्यात आली.

भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक : जम्मू काश्मीरमधील दोडा इथल्या देसा जंगलात भारतीय सैन्य दलातील कमांडो, जम्मू काश्मीर पोलिसांचं विशेष पथक आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त पथकानं सलग तिसऱ्या दिवशी दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. देसा इथं सुरू असलेल्या कारवाईत बुधवारी दहशतवाद्यांनी रात्री 10.45 वाजता खलान भट्टाच्या जंगलात गोळीबार केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी पहाटे 2 वाजता पंचान भाटावर गोळीबार सुरू केला, मात्र या गोळीबाराला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

भारतीय सैन्य दलाच्या 4 जवानांना वीरमरण : जम्मू काश्मीरमधील दोडामधील देसा जंगलात सोमवारी संध्याकाळी दहशतवादी आणि भारतीय सैन्य दलात चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्य दलाच्या चार जवानांना वीरमरण आलं. या जवानांमध्ये एका कॅप्टनचाही समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे जवान दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यांना सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता, त्यांना वीरमरण आलं. या जखमी जवानापैकी यातील एक जवान अद्यापही मृत्यूशी झुंज देत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग इथले कॅप्टन ब्रिजेश थापा, आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथले नाईक डी राजेश, शिपाई बिजेंद्र आणि शिपाई अजय, दोघंही राजस्थानमधील झुंझुनू इथले आहेत. हे सर्वजण 10 राष्ट्रीय रायफल्सचे जवान आहेत.

हेही वाचा :

  1. कुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमक; सहा दहशतवादी ठार, अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांच्यासह एका जवानाला वीरमरण - ENCOUNTER IN KASHMIR
  2. दोडामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांची चकमक; सैन्यदलाच्या चार जवानांना वीरमरण - Doda Encounter
  3. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच जारी, माहिती दिल्यास मिळणार 20 लाखांचं बक्षीस - Terrorists sketch

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.