ETV Bharat / bharat

दोडामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांची चकमक; सैन्यदलाच्या चार जवानांना वीरमरण - Doda Encounter - DODA ENCOUNTER

Doda Encounter : दोडा जिल्ह्यातील देसा जंगलात दहशतवादी आणि भारतीय सैन्य दलाच्या जवानांमध्ये सोमवारी सायंकाळी चकमक उडाली. या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे 5 जवाना गंभीर जखमी झाले. या गंभीर जवानांपैकी चार जवानांना वीरमरण आलं आहे. चकमक अद्याप सुरू असून भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं आहे, अशी माहिती White Knight Corps च्या वतीनं सोशल माध्यमांवर देण्यात आली.

Doda Encounter
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 7:58 AM IST

जम्मू Doda Encounter : जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात भारतीय सैन्य दलाच्या जवानांची सोमवारी दहशतवाद्यांशी चकमक उडाली आहे. या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे 5 जवान गंभीर जखमी झाले होते. या जखमी जवानांवर उपचार सुरू असताना गंभीर जखमी असलेल्या चार जवानांना वीरमरण आलं आहे. भारतीय सैन्य दलाच्या 4 जवानांना वीरमरण आल्याची माहिती भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं प्रसार माध्यमांना दिली आहे.

सोमवारी सायंकाळी उडाली चकमक : भारतीय सैन्य दलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात असताना त्यांना देसा फॉरेस्टमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी या परिसरात शोधमोहीम सुरू केली. मात्र दहशतवाद्यांचा शोध घेताना जवानांवर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामुळे उडालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे 5 जवान गंभीर जखमी झाले. या जवानांना तत्काळ सैन्य दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यातील चार जवानांना वीरमरण आलं आहे.

दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू : दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्य दलाचे जवान प्रत्युत्तर देत असल्याची माहिती भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे. देसा जंगलातील परिसरात ही चकमक उडाली असून सैन्य दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेराव घातला आहे, अशी माहितीही भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं दिली. सध्या दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू आहे. देसाच्या जंगलात अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. भारतीय सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी या चकमकीवर लक्ष्य ठेऊन असल्याची माहिती भारतीय सैन्य दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे.

हेही वाचा :

  1. कुलगाममध्ये दोन ठिकाणी चकमक; सहा दहशतवादी ठार, अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांच्यासह एका जवानाला वीरमरण - ENCOUNTER IN KASHMIR
  2. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच जारी, माहिती दिल्यास मिळणार 20 लाखांचं बक्षीस - Terrorists sketch
  3. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी-सुरक्षा दलांमध्ये चकमक; दहशतवाद्याला कंठस्नान - Encounter Militants and Security

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.