ETV Bharat / bharat

Delhi Liquor Scam Case : 'संजय सिंह यांना शपथविधीसाठी संसदेत हजर करा'; दिल्ली न्यायालयाचे तिहार कारागृह प्रशासनाला निर्देश

Delhi Liquor Scam Case : आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना दिल्ली दाऱू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. संजय सिंह यांना शपथविधी सोहळ्यासाठी संसदेत नेण्यात यावं असे आदेश दिल्ली न्यायालयानं दिले आहेत.

author img

By ANI

Published : Mar 18, 2024, 11:10 AM IST

Delhi Liquor Scam Case
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह

नवी दिल्ली Delhi Liquor Scam Case : आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना दिल्ली दारू घोटळ्यात अटक करण्यात आलं आहे. मात्र आम आदमी पक्षानं त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं आहे. त्यामुळे संजय सिंग या खासदार शपथविधी सोहळ्यास 19 मार्चला पुरेशा सुरक्षा व्यवस्थेत संसदेत नेण्यात यावं, असे निर्देश दिल्ली न्यायालयानं दिले आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत.

संजय सिंग यांना दिल्ली दारू घोटाळ्यात अटक : आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना दिल्ली दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. दिल्ली दारू घोटाळ्यात या अगोदरच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर संजय सिंह यांनाही अटक करण्यात आली. याच प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं 9 वं समन्स बजावलं आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडं बीआरएस नेत्या के कविता यांनाही शुक्रवारी ईडीनं हैदराबाद इथून दिल्लीला नेलं होतं. त्यानंतर के कविता यांना अटक करण्यात आली आहे. के कविता यांना 23 मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

संजय सिंह यांना न्यायालयानं घालून दिली बंधनं : आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना तिहार कारागृहात ठेवण्यात आलं आहे. त्यांना शपथविधीसाठी 19 मार्चला संसदेत नेण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. मात्र यावेळी संजय सिंह यांना अनेक बंधनं न्यायालयानं घालून दिली आहेत. विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी 16 मार्च 2024 रोजी याबाबतचे आदेश दिले आहेत. यात आरोपी संजय सिंह यांना "मोबाईल फोन वापरण्याची मुभा देण्यात आली नाही. या प्रकरणातील संशयित आरोपी, साक्षीदारांना बोलण्याची परवानगी दिली जाणार नाही. सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदारांना बोलता येणार नाही. संजय सिंह यांना पत्रकारांना संबोधित करण्याची किंवा कोणतीही सार्वजनिक सभा आयोजित करण्याची परवानगी दिली जाणार नाही," असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

दिल्ली दारू घोटाळ्यात संजय सिंगाचा समावेश : दिल्ली दारू घोटाळ्यात संजय सिंह यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयानं विविध आरोपांचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे ईडीनं संजय सिंह यांना अटक केली आहे. संजय सिंग यांना या अगोदरही फेब्रुवारी महिन्यात शपथ घेण्यासाठी संसदेत हजर राहण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यावेळी काही कारणांमुळे त्यांना शपथ दिली गेली नाही.

हेही वाचा :

  1. Delhi Excise Police Case: लोकसभा निवडणुकीतही शुक्लकाष्ठ थांबेना! ईडीकडून नवव्यांदा अरविंद केजरीवाल यांना समन्स
  2. ईडीची मोठी कारवाई, 'आप'च्या बड्या नेत्यांच्या ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी
  3. ED Arrest AAP MP Sanjay Singh : 'आप'ला मोठा झटका; दारू घोटाळा प्रकरणी खासदार संजय सिंह यांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.