दिल्ली Arvind Kejriwal Gets Bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं जामीन मंजूर केलाय. या प्रकरणात अटक करण्यात आलेले केजरीवाल हे जामीन मिळवणारे दुसरे राजकारणी आहेत. यापूर्वी सुप्रीम कोर्टानं खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर केला होता.
लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन : यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना 21 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. 2 जून रोजी आत्मसमर्पण केल्यानंतर ते पुन्हा तिहार तुरुंगात गेले होते. त्यानंतर त्यांनी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. विशेष न्यायाधीश न्याय बिंदू यांच्या न्यायालयानं त्यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देता यावं, यासाठी जामीनपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी 48 तासांचा अवधी द्यावा, अशी विनंती ईडीनं न्यायालयाला केली. या आदेशाला स्थगिती दिली जाणार नसल्याचं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं आहे.
केजरीवाल शुक्रवारी तुरुंगातून बाहेर येणार? : यावेळी ट्रायल कोर्टानं सांगितलं की, जामीनपत्र उद्या न्यायाधीशांसमोर सादर केलं जाईल. केजरीवाल शुक्रवारी तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या सुटकेपूर्वी ईडी दिल्ली उच्च न्यायालयात जाऊन न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मागू शकते, असं मानलं जात आहे. केजरीवाल यांना २१ मार्च रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.
घोटाळ्यात वापरलेल्या पैशाचे छायाचित्र जप्त : सलग दोन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता. अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना, ईडीनं गुरुवारी न्यायालयात दावा केला, की दारू घोटाळ्यात वापरलेल्या पैशाचे छायाचित्र जप्त करण्यात आलं आहे. केजरीवाल यांनी 100 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा दावा केंद्रीय तपास यंत्रणेनं केला होता. त्याचवेळी, केजरीवाल यांच्यावतीनं उपस्थित असलेल्या वकिलानं म्हटलं की, संपूर्ण प्रकरण केवळ सरकारी साक्षीदारांच्या जबाबावर आधारित आहे.
'हे' वाचलंत का :
- विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांवर सर्वच पक्षांचा डोळा: उद्धव ठाकरेंचं पारडं जड, समाजवादी पक्षाच्या आशाही उंचावल्या - Assembly Election 2024
- नीटनंतर आता नेट परीक्षेचाही खेळखंडोबा! परीक्षा रद्द केल्यानं खासदार सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा - Supriya Sule
- रशिया-युक्रेन युद्ध थांबवणाऱ्या मोदींना पेपर लीक का थांबवता आलं नाही; भाजपाचा शैक्षणिक संस्थांवर कब्जा - राहुल गांधी - Rahul Gandhi on NEET