ETV Bharat / bharat

सभेला संबोधित करताना अचानक मल्लिकार्जुन खर्गेंची तब्येत खालावली; म्हणाले, "...तोपर्यंत मरणार नाही" - Mallikarjun Kharge fell Ill - MALLIKARJUN KHARGE FELL ILL

Mallikarjun Kharge fell Ill : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जसरोटा पट्ट्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे यांची तब्येत अचानक खालावली. तत्काळ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले.

Mallikarjun Kharge fell Ill
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2024, 5:49 PM IST

Updated : Sep 29, 2024, 6:13 PM IST

नवी दिल्ली Mallikarjun Kharge fell Ill : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील जसरोटा पट्ट्यात रविवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची तब्येत खालावली. त्यामुळं खर्गे यांना काही काळ आपलं भाषण थांबवावं लागलं. खर्गे यांना आधार देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर काँग्रेस नेते त्यांच्याभोवती जमले होते.

इतक्या लवकर मरणार नाही : खर्गे यांची तब्येत खालावल्यानं त्यांनी काही काळासाठी भाषण थांबवलं होतं. थोड्या विश्रांतीनंतर खर्गे हे पुन्हा मंचावर परतले आणि त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. "आम्ही राज्यत्व पुनर्संचयित करण्यासाठी लढू. मी 83 वर्षांचा असून, इतक्या लवकर मरणार नाही. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून हटवले जात नाही तोपर्यंत मी जिवंत असेन," असं म्हणत मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपासह मोदींवर निशाणा साधला.

रक्तदाब कमी झाला : या संदर्भात कर्नाटकचे मंत्री आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी 'एक्स'वर पोस्ट शेयर केली की, "जम्मू-काश्मीरच्या जसरोटा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना थोडे अस्वस्थ वाटले. वैद्यकीय पथकानं त्यांची तपासणी केली. यात त्यांचा रक्तदाब कमी असल्याचं समजलं. सध्या त्यांची तब्येत ठीक आहे. जिद्द आणि लोकांच्या शुभेच्छा त्यांना मजबूत ठेवत आहेत."

मल्लिकार्जुन खर्गे यांची तब्येत स्थिर : मल्लिकार्जुन खर्गे यांची तब्येत आता स्थिर असून, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत, असं वृत्तसंस्था 'पीटीआय'नं काँग्रेस नेत्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे. कठुआमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यात एका जवानाला वीरमरण आलं होतं. त्या जवानाला खर्गे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

हेही वाचा - राहुल गांधी भारतीय की विदेशी नागरिक ? लखनौ उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडं विचारणा - Rahul Gandhi Citizenship

Last Updated : Sep 29, 2024, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.