नवी दिल्ली : विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरदारपणे सुरू आहे. मात्र जागा वाटपांवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत मोठा वाद सुरू आहे. त्यातच महाविकास आघाडीतील नेते नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यात जागा वाटपांवरुन वाद झाल्याची चर्चा आहे. शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबिसी जागांवरुन नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर नाना पटोले यांनीही आक्रमक होत आम्ही ओबीसी कोट्यासाठी अधिक जागांची मागणी केली. आमची ही मागणी पूर्ण होईल, अशी माहिती वृत्तसंस्थेला बोलताना दिली.
#WATCH | After meeting with party leadership at AICC on upcoming Assembly elections and seat-sharing issue, Maharashtra Congress President Nana Patole says, " ...we are demanding some seats...on the seats we have got, we have tried to do justice to obc (candidates)..." pic.twitter.com/RbDOR0U7Pa
— ANI (@ANI) October 25, 2024
जागा वाटपांबाबत काय म्हणाले नाना पटोले : विधानसभा निवडणूक 2024 च्या जागा वाटपांसाठी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीत पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांना माहिती दिली. राहुल गांधी यांची सर्वसमावेश विकासाला प्राध्यान्य देण्याची भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मिळालेल्या जागांमध्ये ओबीसी घटकाला जागा देण्यासाठी आम्ही काही जागांची मागणी केली. आहे. राहुल गांधी यांचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे आता आम्ही बाळासाहेब थोरात यांना बैठकीला पाठवू, त्यानंतर याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
#WATCH | Delhi | Congress' in-charge for Maharashtra, Ramesh Chennithala says, " all is well in maharashtra, maha vikas aghadi. we are going to fight the election together. there is no problem in maha vikas aghadi. the problem is in mahayuti. we are together and we are working out… pic.twitter.com/w9xXNkoqNu
— ANI (@ANI) October 25, 2024
हेही वाचा :