ETV Bharat / bharat

"ईडीसह पीएमएलएचा कायदा रद्द केला तर अर्धे लोक...," -अरविंद केजरीवाल यांचा भाजपावर निशाणा - अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Taunts BJP: काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या निवासस्थानी आज (18 फेब्रुवारी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडी आणि पीएमएलएच्या कायद्यावरून भाजपाला टोला लगावला.

bjp will leave party
अरविंद केजरीवाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 10:36 PM IST

Updated : Feb 18, 2024, 10:52 PM IST

अरविंद केजरीवाल भाजपावर निशाणा साधताना

नवी दिल्ली Arvind Kejriwal Taunts BJP : आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (18 फेब्रुवारी) भाजपावर केला. भाजपावर इतर पक्षांचे नेते आणि आमदार फोडल्याचा आरोप करत केजरीवाल म्हणाले, ''सगळे भाजपामध्ये का जात आहेत? ईडी आणि पीएमएलए रद्द केला तर निम्मे लोक भाजपा पक्ष सोडतील. वसुंधरा आणि शिवराज आपला नवा पक्ष स्थापन करणार आहेत.''

तर भाजपातले नेते नवीन पक्ष काढतील: मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ''भाजपानं ईडी आणि पीएमएलएची भीती दाखवणे बंद केले तर भाजपाचे निम्मे नेते पक्ष सोडतील. भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते नवा पक्ष काढणार आहेत.''

केजरीवालाचं वक्तव्य चर्चेचा विषय: गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. एवढंच नाही तर चंदीगड महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून विजयी झालेले काही नगरसेवकही भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेत्यांबाबतच्या चर्चेवर केजरीवाल यांचे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

केजरीवाल यांना अटक होणार? विधानसभेत शनिवारी विश्वासदर्शक ठरावावर झालेल्या चर्चेदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, ''या सभागृहात आमचे बहुमत आहे.'' आमचे दोन आमदार माझ्याकडे आले. त्यांनी सांगितले की, ''भाजपाचे लोक त्यांच्याकडे आले आहेत. केजरीवाल यांना अटक होणार असल्याचे सांगण्यात आलं. यानंतर आम्ही दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडू. सर्व आमदारांना काढून टाकू. आम आदमी पक्षाचे २१ आमदार आमच्या संपर्कात आहेत. इतरांशीही चर्चा सुरू आहे, तुम्हीही या, आम्हीही २५ कोटी देऊ.''

21 नव्हे तर 7 आमदारांशी संपर्क: केजरीवाल म्हणाले की, ''यानंतर आम्ही आमच्या सर्व आमदारांशी संपर्क साधला. तेव्हा कळलं की, त्यांनी 21 नव्हे तर केवळ 7 आमदारांशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, ''हे लोक म्हणतात पुरावे द्या. आम्ही पुरावे कसे द्यायचे आणि काय पुरावे द्यायचे? एखादी व्यक्ती त्याच्या खिशात टेपरेकॉर्डर घेऊन फिरत नाही."

ईडीनं केजरीवालांना या चौकशीसाठी बोलावलं: दारू घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीनं सोमवार, 19 फेब्रुवारी रोजी पुन्हा अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. अशा स्थितीत यावेळीही ईडीच्या समन्सवर मुख्यमंत्री चौकशीसाठी जाण्याची शक्यता कमी आहे. असं असलं तरी दिल्ली विधानसभेचं अधिवेशन सुरूच आहे.

हेही वाचा:

  1. नगरविकास खात्यासाठी एकनाथ शिंदे 'मातोश्री'वर येऊन रडले होते- आदित्य ठाकरेंचा दावा
  2. काँग्रेसच्या आमदारांची नाराजी कायम, हायकमांडने तोडगा काढण्याची मागणी
  3. मातोश्रीच्या पायऱ्या कोण चढलं होतं?; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह अमित शाहांना सवाल

Last Updated : Feb 18, 2024, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.