रांची Chirag Paswan on tirupati Prasad : तिरुपती इथल्या बालाजी मंदिरात देण्यात येणाऱ्या प्रसादात जनावरांची चरबी मिसळलेली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी मोठा संताप व्यक्त केला. कोरडो भाविकांच्या आस्थेशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या. हा विषय आमच्या भावनेशी संबंधित असून तो अजिबात खपवून घेणार नाही, असंही त्यांनी यावेळी ठणकावलं. चिराग पासवान हे विदानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी झारखंडच्या दौऱ्यावर आले असता, रांचीमध्ये प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत ते बोलत होते.
करोडो भाविकांच्या आस्थेशी खेळण्याचा प्रयत्न : तिरुपती इथल्या श्री बालाजी मंदिरात देण्यात येणाऱ्या प्रासादांच्या लाडूत जनावरांची चरबी मिसळल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र जर "असा प्रकार होत असेल, तर हा आमच्या भावनेशी निगडीत आहे. तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी," अशी मागणी चिराग पासवान यांनी केली. भविष्यात असा प्रकार घडू नये, यासाठी सरकारनं काळजी घ्यावी, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीचा घेतला आढावा : आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान हे झारखंड राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तिरुपती प्रसादावर आपलं मत व्यक्त केलं. त्यासह त्यांनी यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. यावेळी चिराग पासवान यांनी "आगामी विधानसभा निवडणूक ज्या राज्यात होत आहे, त्या राज्यात आमचा पक्ष मजबूत होण्यासाठी आमची तयारी सुरू आहे. पक्ष मजबूत करुन आम्ही आगामी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आगामी निवडणूक ही युती करुन लढवायची की स्वबळावर लढवायची याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येणार आहे," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. चिराग पासवान हे आज सकाळी नवी दिल्लीवरुन रांचीला पोहोचले. यावेळी त्यांनी आज लातेहार, 29 तारखेला धनबाद, 6 ऑक्टोबरला जमशेदपूरला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- खासदार कंगना रनौत आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचं संसदेत 'पुनर्मिलन' !! - Kangana Ranaut and Chirag Paswan
- बिहारमध्ये एनडीए 40 जागा तर लोक जनशक्ती पार्टी 5 जागा जिंकेल - चिराग पासवान - Chirag Paswan On Lok Sabha Election
- MP Chirag Paswan Demands President Rule : बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लावा, खासदार चिराग पासवान यांची मागणी