ETV Bharat / bharat

इंडियन ओव्हरसीज बँक प्रकरण; 108 कोटी रुपयाचं कर्ज बुडवल्यानं विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट - NBW Against Vijay Mallya

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 2, 2024, 10:15 AM IST

NBW Against Vijay Mallya : विदेशात फरार असलेला उद्योगपती विजय मल्ल्या याला विशेष न्यायालयानं चांगलाच दणका दिला. विशेष न्यायालयानं फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्या याला इंडियन ओव्हरसीज बँकेचं 108 कोटी कर्ज बुडवल्यानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं.

NBW Against Vijay Mallya
उद्योगपती विजय मल्ल्या (ETV Bharat)

मुंबई NBW Against Vijay Mallya : इंडियन ओव्हरसीज बँकेचं (IOB) 180 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयानं फरार उद्योगपती विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केलं आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस पी नाईक निंबाळकर यांनी 29 जून रोजी विजय मल्ल्याविरुद्ध अजामीनपात्र वारंट जारी केलं. याबाबतचा सविस्तर आदेश सोमवारी जाहीर करण्यात आला आहे.

फरार विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वारंट : इंडियन ओव्हरसीज बँकेच्या 180 कोटी रुपये बुडल्याच्या प्रकरणात सीबीआयनं विशेष न्यायालयात बाजू मांडली. सीबीआयनं विजय मल्ल्या फरार असल्याबाबतची स्थिती न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे विशेष न्यायालयानं " विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करणं योग्य आहे. विजय मल्ल्या समोर येण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट काढणं गरजेचं आहे," असं न्यायालयानं नमूद केलं. "किंगफिशर कंपनी बंद पडली आहे. किंगफिशर कंपनीनं देयकं चुकवून सरकारी बँकांचं 180 कोटी रुपयांचं नुकसान केलं," अशी बाजू सीबीआयच्या वतीनं न्यायालयात मांडण्यात आली.

फरार विजय मल्ल्या विदेशात : मनी लाँड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं अगोदरच आर्थिक गुन्हेगार म्हणून विजय मल्ल्याला फरार घोषित केलं आहे. विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये राहत असून भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. विशेष न्यायालयानं विजय मल्ल्याविरोधात काढलेलं हे वॉरंट 2007 ते 2012 या काळात इंडियन ओव्हरसीज बँकेच्या कथित 180 कोटी रुपये बुडवल्यानं काढलं आहे. या प्रकरणी सीबीआयनं विजय मल्ल्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता विशेष न्यायालयानं विजय मल्ल्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानं विजय मल्ल्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. G20 summit : जी-२० शिखर परिषदेत फारारी गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणावर भारताचा भर
  2. CBI On Vijay Mallya Property: विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार शासकीय एजन्सीला; सीबीआयचे उच्च न्यायालयात आरोपपत्र
  3. Lalit Modi Life : सुष्मिता सेनला डेट करणाऱ्या मोदीने, विजय मल्ल्याच्या मुलीला ठेवले होते पर्सनल असिस्टंट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.